अतिदुर्गम भागात रस्ता नसल्याने गर्भवती महिला नातेवाईच्या मदतीने झोळीत प्रवास: राजकांरण्योंनो, जमलं तर लक्ष द्या

अक्राणी :- देशाला स्वातंत्र्य मिळवून ७६ वर्ष पूर्ण झाली दुसरीकडे आदिवासी पाड्यात रस्ता नसल्याने दुरवस्था आहे अक्राणी तालुक्यातील सावऱ्यादिगर (पलाजाडीपाडा) येथील गांवा पर्यंत रस्ते नसल्याने कारणाने सादरीच्या झोळीत घेऊन पायपीट प्रवास करावा लागतो आहे त्यामुळे रुग्णवाहिका पोचू शकत नाही बिलगांव (निलदयपाडा) ते सावऱ्यादिर (पलाजाडीपाडा) रस्ता अपूर्ण काम असल्याने स्थानिक नागरिकांनी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे सातपुड्यातील दुर्गम भागातील नागरिकांना आजही मुलभूत सुविधा पासून वंचित आहे अशा अनेक मुलभूत सुविधा मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला आहे.अजून वीज पोहोचली नाही शालेय शिक्षण - उच्च शिक्षणासाठी आणि गरोदर महिलांना प्रस्तुतीसाठी व प्राथमिक उपचारांसाठी तालुका रुग्णालयात धडगाव याठिकाणी घेऊन जावे लागते आहे. गुलीबाई बाण्या पावरा(वय२०) व पतिसह या महिलेला सावऱ्या दिगर (नायणीपाडा)आशाताई प्रमिला दाकल्या पावरा यांच्या मदतीने पलाजाडीपाडा ते एक किलो मीटर धक्कादायक पायी चालत रस्ता गाठला.एक किलोमीटर अंतर सादरीच्या झोळीत घेऊन नातेवाईकासंह  रस्ता पार केला. अपूर्ण रस्ता लवकर पूर्ण करावे असे स्थानिक लोकांची मागणी आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार