धडगाव:-नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत बिलगाव येथे वनांचल समृद्धी अभियान अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली. बिलगाव हे गाव अतिदुर्गम भागात असून धडगाव शहरापासून 21 किलोमीटर अंतरावर आहे. बिलगाव येथील युवा सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा हिच्या सहकार्याने ग्रामपंचायत बिलगाव येथे एकूण १५०० झाडे लावण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री .भरत जाल्या पावरा यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी आजच्या युगात झाडांचे महत्त्व काय आहे हे ग्रामस्थांना थोडक्यात सांगितले .यावेळी वृक्ष लागवड करण्यासाठी बिलगाव येथील युवा सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा, उपसरपंच दलदार मिठ्या पावरा, गोटन रोहिदास पावरा सदस्य, जामसिंग काल्या पावरा कार्यकर्ता ,गोविंद सेगा पावरा ग्रामरोजगार सेवक ,दिनेश रमेश पावरा , लालशा जहांगीर पावरा, भरत जाल्या पावरा ग्रामपंचायत ऑपरेटर, ठूमला सेगा पावरा, सुभाष रोडत्या पावरा ,गणेश जयसिंग पावरा ,श्रीमती शोभा भिमसिंग पावरा अंगणवाडी सेविका, फुलवंती महेंद्र पावरा अंगणवाडी सेविका ,हिरा नटवर पावरा अंगणवाडी सेविका, कविता विजय पावरा अंगणवाडी सेविका , बबिता सुनिल पावरा आशा वर्कर , रिना तेजकांत पावरा आशा वर्कर , गिना बारक्या पावरा आशा वर्कर, प्रमिला दाकल्या पावरा आशा वर्कर तसेच आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment