जयश्री वाघ, या विद्यार्थ्यांनी जाहीर निषेध नोंदवून आपलं मनोगत व्यक्त केले. आता पर्यंत महाराष्ट्रात झालेल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना बद्दल या विद्यार्थ्यांनी त्या घटना बद्दल समाजकार्याच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महिलांचे संरक्षण कायदा विषयी आई-वडिलांचे संस्कार मुली मुलांना एक पासवर्ड दिला पाहिजे. समाजात जनजागृती केली पाहिजे. सरकारने लाडकी बहीण योजनाचा लाभ देण्यापेक्षा देण्यापेक्षा लाडकी बहिणीला संरक्षण दिले गेले पाहिजे असेही त्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनातून सांगितले.
त्यानंतर महाविद्याचे प्राचार्य प्रा. डॉ. विष्णू गुंजाळ यांनी महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
*आता पर्यंत महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना झालेल्या आहे, त्याचे नावे पुढील प्रमाणे*
1) 13 ऑगस्ट बदलापूर मुबंई (शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार)
2) 15 ऑगस्ट पुणे
(शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न)
3) 20 ऑगस्ट अकोला
( शिक्षकाकडून सहा मुलींच्या विनयभंग)
4) 20 ऑगस्ट मुंबई
(ठाण्यात गतिमंद मुलींवर अत्याचार, चांदिवली मध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार)
5) 20 ऑगस्ट लातूर
( साडेचार वर्षांच्या मुलींवर लैंगिक छेडछाड)
6) 21 ऑगस्ट नाशिक
( साडेचार वर्षाच्या मुलीचं अपहरण करून अत्याचार)
7) 21 ऑगस्ट मुंबई
( अपंग अल्पवयीन मुलींवर अत्याचार, कार मध्ये दोन अल्पवयीन मुलींच्या शेजाऱ्यांकडून विनयभंग)
8) 21 ऑगस्ट पुणे
( अल्पवयीन तरुणीवर मैत्रिणीच्या मदतीने दोन मित्रांनी केला अत्याचार)
9) 22 ऑगस्ट नागपूर
( आठ वर्षीय मुलींवर शेजाऱ्यानेच केला अत्याचार)
10) 22 ऑगस्ट कोल्हापूर
( दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या)
इत्यादी घटना संदर्भात महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी
अशा प्रकारे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना झालेल्या आहेत.
इत्यादी घटना संदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.डॉ. विष्णू गुंजाळ यांनी जाहीर निषेध नोंदवला. अशा घटना समाजात घडत असताना आपण त्या घटनेच्या निषेध नोंदवून जनजागृती रॅली काडून व महिला संरक्षण संदर्भात काही घोषणा सांगून जनजागृती केली पाहिजे. या घटना कशा घडतात त्याच्या शोध घेतला पाहिजे. मोबाईलचा वापर करताना चांगल्या गोष्टी शोधल्या पाहिजे असेही प्राचार्य प्रा. डॉ.विष्णू गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. प्रत्येक दिवसाला महिलांवर अत्याचाराचे घटना घडत असतात पण त्याची नोंद केली जात नाही. त्यामुळे मुलांना व मुलींना आवहान करण्यात येते की, समाजात अशा प्रकारे घटना घडत असताना आपण जनजागृती करणे गरजेचे आहे व कायद्याविषयी समाजातील लोकांना माहिती सांगणे महत्त्वाचे आहे. गुड टच व बॅड टच वाईट नजरेने पाहणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे असेही म्हणाले. विद्यालयामध्ये शिक्षक कर्मचारी विद्यार्थी गैरप्रकारे मुलींसोबत चुकीचे वर्तन करत असेल तर त्याच्यावर ही कारवाई करण्यात येईल,असे सांगितले. कोणत्याही प्रकारचे राजकीय पक्षाच्या त्या व्यक्तीला सपोर्ट असेल तरी त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल असेही मिळाले. चुकीच्या वर्तन करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे असे विद्यार्थ्यांना सांगितले.
हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग मार्फत घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. राहुल आहेर यांनी केले.
या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विष्णू गुंजाळ, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्रा. डॉ. राहुल आहेर, विद्यार्थी विकास विभाग अधिकारी प्रा. डॉ. राजेंद्र बैसाणे, प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर, तसेच विद्यालयाचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.
Post a Comment