नंदुरबार:- नंदुरबार जिल्ह्याधिकारीपदी डॉ मिताली सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नंदुरबार येथील जिल्हाधिकारीपदी वसंतराव नाईक राज्य कूषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर येथील संचालक डॉ.मिताली सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ९ ऑगस्ट ला जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधीकरणच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांचा पदभार अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या कडे संपविण्यात आला आहे. राज्य शासनाने राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांचे बदल्यांचे आदेश काढले. त्यात नंदुरबार जिल्ह्याधिकारीपदी डॉ मिताली सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.