धडगाव :- दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी शासकीय आश्रम शाळा सोनखुर्द व शेलगदा येथे जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी 9 वाजता शाळेपासून ते ग्रुप ग्रामपंचायत पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत विध्यार्थी, शिक्षक, शाळेचे शिक्षकेत्तोर कर्मचारी, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले,विध्यार्थी व शिक्षक यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान केली.मिरवणुकीत पारंपारिक वादय ढोल, मांदल, तुतडया, वाजवण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्यध्यापक श्री. बी. सी. पावरा सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. केवजी दादा पाडवी ( सा. कार्यकर्ता )हे होते. कार्यक्रम सुरु करण्यापुर्वी आदिवासी क्रांतीविरांच्या प्रतिमिचे पूजन मुख्याध्यापक श्री. बी. सी पावरा यांच्या हस्ते करण्यात आले. विध्यार्थी व विदयार्थीनी यांनी भाषणे व आदिवासी जीवनाबद्दल गीत गाईली. शिक्षकांनी आपली मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तोर कर्मचारी शाळेचे अधीक्षक, अधिक्षिका यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री. अहिरे सर यांनी केले तर,सूत्रसंचालन श्री. वसावे सर व आभार प्रदर्शन श्री. गुलाब पटले यांनी केले.
Post a Comment