वृक्ष ही केवळ निसर्गाची शोभा नाहीत, तर ते आपल्या जीवनाचे आधार आहेत. झाडे आपल्याला शुद्ध हवा देतात, पाणी संरक्षित करतात, जमिनीचा धूप थांबवतात, आणि विविध प्राणी आणि पक्ष्यांना निवासस्थान पुरवतात. एवढेच नाही तर झाडांचे असंख्य औषधीय गुणधर्म आपल्याला विविध रोगांपासून दूर ठेवतात.आजच्या काळात, जगभरात जंगलतोडीमुळे पर्यावरणावर अनेक ताण येत आहेत. जागतिक तापमानवाढ, पाण्याची कमतरता, जमिनीची नाश - या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्याला वृक्षारोपण करणे अत्यंत आवश्यक आहे. 'झाडे लावा, झाडे जगवा' ही केवळ एक घोषणा नाही, तर ती आपल्या भविष्यासाठी एक संकल्प आहे. मुलांनो, आपण भविष्यातील नागरिक आहात आणि आपण जे आज शिकाल, तेच उद्या आपल्याला उपयोगी पडेल. झाडे लावणे आणि त्यांची देखभाल करणे ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येक झाड म्हणजे जीवनाची एक नवी उमेद आहे. अशा शब्दांत कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले व ट्रायबल व्हॉईस फाऊंडेशन चे प्रकल्प व्यवस्थापक श्री. शैलेंद्र वळवी यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंद वळवी होते. तसेच ग्रुप ग्राम पंचायत नंडलवड चे ग्राम सेवक श्री. रोहिदास पावरा. जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शोबी पावरा, उपशिक्षक मंदा पाडवी, जि. प. प्राथमिक शाळा (पावरा पाडा) चे फत्तेसिंग पावरा उपशिक्षक तानाजी पावरा, सिमा चौधरी तसेच ग्रा. सदस्य दुला वळवी, ग्रामस्त भिमसिंग वळवी, चंद्रसिंग वळवी, बंज्या वळवी, अंगणवाडी सेविका मीना वळवी. व समन्वयक मनिषा पावरा, किरण पावरा, मिनाक्षी वळवी, अंकुश वसावे, आकाश पावरा आदी उपस्थित होते. या प्रसंगी अतिथी म्हणून उपस्थित असलेले पिऱ्यामल फाऊंडेशन चे प्रतिनिधी श्री. बबलू डावर (म. प्र) यांनी ट्रायबल व्हॉईस फाऊंडेशन ची दखल घेऊन संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली.
कार्यक्रमानंतर शाळेच्या आवारात वृक्ष रोपण करण्यात आले व तसेच पावरा पाडा येथिल विद्यार्थ्यांची वृक्ष दिंड काढण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिनेश पावरा यांनी केले.
Post a Comment