धडगाव:- आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन शासकीय माध्यमिक आश्रम शाळा रोषमाळ ता धडगाव जि. नंदुरबार यांच्या वतीने आदिवासी गौरव दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.पळसाच्या पानाने पारंपरिक पद्धतीने आद्यशक्ती याहा मोगी माता व आदिवासी क्रांतिवीरांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.शिक्षकानी आपल्या मनोगतातून तसेच आदिवासी पारंपरिक वाद्य,आदिवासी पारंपरिक नृत्य,आदिवासी पारंपरिक लोकगीत सादर करून व आदिवासी वेशभूषा परिधान करून आदिवासी दिनाला संबोधित केले._यातून अस्तिवात्मक,सांस्कृतिक व राष्ट्रीय एकात्मताची भावना विदयार्थ्यांमध्ये निर्माण झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक गुलाब पावरा होते सूत्रसंचालन संजय पावरा यांनी केले आभार पाडवी सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक गुलाब पावरा सहशिक्षक संजीवनी पटले ,कविता पावरा ,मगन तडवी ,संजय पावरा रेहमल पटले ,सी. एस. पावरा , किसन पावरा , पाडवी तसेच अधीक्षक, अधीक्षीका , सर्व वर्ग चार कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.