डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात संशोधन कार्यशाळा संपन्न

मोराणे - संशोधन संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी, विद्यार्थ्यांनी अधिकाधिक समाज उपयोगी संशोधन करावे यासाठी समता शिक्षण संस्था पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय येथे 29  ते 30 जुलै 2024 या दरम्यान दोन दिवशीय संशोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटन सत्रात महाविद्यालयाचे मा प्राचार्य प्रा. डॉ. विष्णू गुंजाळ अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तर संशोधन सल्लागार समितीचे सदस्य प्रा. डॉ. रघुनाथ महाजन, प्रा. डॉ. फरीदा खान, विभाग प्रमुख प्रा. डॉ गोपाळ निंबाळकर हे उपस्थित होते. यावेळी कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रघुनाथ महाजन यांनी मांडले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा. डॉ. विष्णू गुंजाळ यांनी संशोधन म्हणजे नेमके काय? समाजातील समस्या सोडविण्यासाठी संशोधन कशाप्रकारे महत्त्वपूर्ण आहे. ज्याला प्रश्न पडतात तेथूनच खऱ्या संशोधनाची सुरुवात होते. कोणत्या सामाजिक विषयांवर संशोधन करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. तरच गुणवत्तापूर्ण संशोधन होईल. संशोधन हे शास्त्रीय पद्धतीने करणे गरजेचे आहे. या विविध मुद्द्यांवरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

              सदरील दोन दिवसात प्रा. डॉ. फरीदा खान यांनी संशोधनाचा विषय कसा निवडावा, कोणती काळजी घ्यावी तसेच संशोधनाचा विषय निवडल्यानंतर संशोधना संबंधित साहित्याचा आढावा व सिद्धांत कसे मांडले पाहिजेत याविषयी प्रा. डॉ. रघुनाथ महाजन, संशोधन उद्देश व गृहीत कृत्यांची मांडणी - प्रा. डॉ. सुवर्णा बर्डे, तथ्य संकलन- तंत्र प्रा. डॉ. सुदाम राठोड तथ्य प्रक्रियांवर विश्लेषण प्रा. डॉ. संजीव पगारे, गृहीत कृत्यांची पडताळणी व निष्कर्ष – प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर यांनी संशोधन पद्धती विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

        समारोपीय सत्रात अरुणा मराठे, नरेंद्र पाडवी, यश शेवाळे, जीवन भारुडे,  उज्वला भदाने या विद्यार्थ्यांनी त्यांना काय शिकायला मिळाले? संशोधनाविषयी त्यांची दृष्टी कशाप्रकारे व्यापक तयार झाली याविषयी  आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर सत्राचे अध्यक्ष मा. प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना संशोधन हे भविष्यात नोकरी मिळविण्यासाठी देखील किती महत्त्वपूर्ण आहे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना संशोधना संबंधित जे प्रश्न होते त्याचे निराकरण झाले. सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात कार्यशाळेत सहभाग नोंदवला. यावेळी कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ. रघुनाथ महाजन डॉ. फरीदा खान व डॉ. दिलीप घोंगडे यांनी काम पाहिले. सदरील कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार