कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. प्राथमिक शाळा छापरी चे मुख्याध्यापक श्री. जयंतीलाल परमार होते. तसेच जि.प.प्राथमिक शाळा (गड्डापाडा) चे मु्याध्यापक श्री. अनिल वळवी, उपशिक्षक रामेश्वर मायकर, कुशाल पावरा. तसेच ग्राम पंचायत शिपाई ठुमला वळवी, रोजगार सेवक लालसिंग वळवी व फत्तेसिंग वळवी. अंगणवाडी सेविका उषा वळवी व रेखा मधुकर वळवी, सेगा दादा, इंदास वळवी. तसेच ट्रायबल व्हॉईस फाऊंडेशन चे उपाध्यक्ष युवराज खर्डे, प्रकल्प व्यवस्थापक शैलेंद्र वळवी. तसेच समन्वयक किरण पावरा, मनिषा पावरा, मिनाक्षी वळवी, दिनेश पावरा, अंकुश वसावे व आकाश पावरा आदी उपस्थित होते.
श्री. शैलेंद्र वळवी सरांनी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रास्ताविका मांडली व "एक व्यक्ती एक झाड" ही संकल्पना संस्थेच्या पुढाकाराने राबवत असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. व सामाजिक वनीकरण शाहादा (धडगांव) च्या संलग्नित असलेल्या मांडवी रोपवाटिकेतून विविध प्रकारच्या रोपांची उपलब्धता करून दिल्या बद्दल विभागाचे आभार व्यक्त केले. तसेच श्री. अनिल वळवी सरांनी उपस्थित गावकरी व शाळकरी विद्यार्थ्यांना एक व्यक्ती, एक झाड. या उपक्रमाचे महत्व पटवून देताना प्रत्येक व्यक्तीने आपल्या परिसरात किमान एक झाड लावावे, आणि त्याला कुंपण करून, नियमित पाणी द्यावे व आपल्या सोबत त्या वृक्षाला देखील आपल्या नावाने मोठे करावे. अशा शब्दात सरांनी मार्गदर्शन व आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक आकाश पावरा यांनी केले. तसेच कार्यक्रमानंतर उपस्थित गावकऱ्यांना, आंबा, महू, खैर, आवळा, बांबू, सिसम व कुरली आदी झाडांची रोपे वाटप करण्यात आले, व त्यानंतर शाळकरी मुले आणि ट्रायबल व्हॉईस चे सर्व प्रतिनिधी मिळून शाळेच्या आवारात वृक्ष रोपण करण्यात आले.
Very nice
ReplyDeletePost a Comment