जिल्हा परिषद शाळा सिंगलखेत पाडा गोरांबा ता.अक्राणी जि.नंदुरबार या शाळेत एकूण ४२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेत २ शिक्षक कार्यरत आहेत. इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंतच्या वर्गासाठी फक्त १ इमारत आहे.ती इमारतही पडीक अवस्थेत आहे.सन १९९७ पासून शाळा सुरू असून शाळेच्या इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. दरवाजे,खिडक्या तुटलेले आहेत, भितींवरचे प्लाॅस्टर निघालेले आहे. इमारतीला भेगा पडल्या आहेत. इमारतीची पाहणी करून इमारत निर्लेखित करण्याची गरज आहे.ही जुनी इमारत नादुरूस्त व धोकादायक अवस्थेत आहे. या इमारतीत विद्यार्थी व शिक्षक यांच्या जीवितास धोका आहे. म्हणून जिल्हा परिषद सिंगलखेत पाडा गोरांबा ता.अक्राणी शाळेसाठी नवीन इमारत त्वरित मंजूर करून बांधण्यात यावी.अशी बिरसा फायटर्स संघटनेने मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे केली आहे.
सिंगलखेत पाडा गोरांबा मराठी शाळेची जीर्ण इमारत धोकादायक- बिरसा फायटर्सचे मुख्य कार्यकारी अधिका-यांना निवेदन
धडगांव :- जिल्हा परिषद शाळा सिंगलखेत पाडा गोरांबा तालुका अक्राणी जिल्हा नंदुरबार शाळेची नवीन इमारत बांधा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनावर राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा आदींच्या सह्या आहेत.
Post a Comment