धुळे :- सोशल मीडियाचा केला जाणारा अतिरिक्त वापर, चैनीच्या गोष्टींचे वाढते आकर्षण ज्यामुळे बालगुन्हेगारीचे प्रमाण समाजात अधिक प्रमाणात वाढताना दिसत आहे परिस्थिती, मित्र, संगत , इतरांकडून दिला जाणारा दबाव यामुळे काही वेळेला बालकांकडून गुन्हा घडतो किंवा अनवधानाने बालकांकडून गुन्हा केला जातो .कोणत्याही परिस्थितीत गुन्हा घडला तरी तो गुन्हाच ठरतो. एकदा गुन्हा घडल्यानंतर बालकाच्या मनावर विपरीत परिणाम होऊन तो पुन्हा गुन्हाच्या मार्गाला लागू नये. त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा मिळावी. त्याने एक चांगले नागरिक व्हावे. याच संकल्पनेतून धुळे जिल्ह्या पोलीस अधीक्षक मा. श्रीकांत धिवरे यांनी 22 जुलै 2024 रोजी मंथन सभागृहात विधी संघर्ष ग्रस्त बालकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी विधी संघर्ष बालकांच्या गुन्हा करण्यापर्यंतचा प्रवास व त्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक व नकारात्मक बदल या दोन्ही बाजू याविषयी पथनाट्याच्या माध्यमातून सादरीकरण केले. पथनाट्य सादर करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. विष्णू गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पथनाट्याच्या माध्यमातून दिलेला संदेश सर्वांनाच प्रेरणा देणारा होता. पथनाट्याच्या सादरीकरणानंतर मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. व सदरील पथनाट्य सादरीकरणासाठी समन्वयक म्हणून प्रा. डॉ. फरीदा खान यांनी भूमिका पार पाडली.