उद्घाटक मा. नामदेव पटलेअध्यक्ष अ.भा. पावरा/बारेला मंडळ व पावरा समाज उन्नती मंडळ शहादाचे अध्यक्ष सुरेश मोरे साहेब होते. तर
बहुभाषिक काव्य संमेलनाध्यक्ष
डॉ.जितेंद्र वसावा तर स्वागताध्यक्ष म्हणून साहित्य परिषदचे अध्यक्ष डॉ. बबन निकुम होते.
कवि प्रेम भंडारी,सुमित्रा वसावे कांतिलाल पाडवी महाराष्ट्र आप. बरखा वळवी ,भिमराज पावरा ,रमेश चौहान, करण तडवी, सुनील पाडवी कॉलरसिंग पावरा,कैलास गावित, सुनिल पावरा,दिपतेश्वरी गुथरे
दिलदार पूर्ती महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात आणि झारखंड राज्यातील कवि सहभागी झालेत आणि आपली मातृ भाषेतून कविता सादर केले.
यावेळी, संमेलनाध्यक्ष डॉ. जितेंद्र वसावा जी आपल्या वक्तव्यात म्हणाले, ' परंपरागत जे आदिवासी साहित्य आहेत. त्याला आधुनिक साहित्य शैलीत मांडण्यापेक्षा पारंपरिक पद्धत वापरून आदिवासी साहित्य निर्माण झाले पाहिजे. यावेळी स्वागताध्यक्ष बबन निकुम यांनी आदिवासी बोली भाषा जतन संवर्धन एंव साहित्य परिषदचे पुढील कार्य नियोजन सांगितले त्यात महत्त्वाचे आदिवासी मौखिक साहित्याचे संकलन करणे व नवोदित साहित्यिकांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहन देणे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दशरथ पावरा व कवि संतोष पावरा यांनी केले. ऑनलाईन ऑपरेटिंग बाबा रेकॉर्डिंग स्टुडिओ शहादा येथून कॉलरसिंग पावरा व राजू डुडवे यांनी केले तर आभार डॉ. विजयसिंग पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी पावरा समाज उन्नती मंडळ, अखिल भारतीय पावरा, बारेला समाज मंडल आणि आदिवासी बोली भाषा संवर्धन एंव साहित्य परिषद यांनी मेहनत घेतली.