धुळे :- समता शिक्षण संस्था पुणे संचलित डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे,ता. जि. धुळे येथील प्रा. डॉ. एस. एस. बर्डे सहित विद्यार्थ्यांनी धुळे महानगरपालिका धुळे येथील उपायुक्त मा. हेमंत निकम यांच्याशी भेट घेऊन धुळे शहराच्या स्वच्छतासाठी काय काय उपायोजना करता येईल या संदर्भात विद्यार्थ्यांची चर्चा केली आणि स्वछता, घनकचरा या विषयी माहिती सांगितली होती.
धुळे शहरातील विविध प्रभागात स्वछता विषयी जनजागृती कार्यक्रम राबविण्या बाबत मा. हेमंत निकम यांनी मार्गदर्शन केले. तसेच सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील यांनी घनकचरा व्यवस्थापन या विषया संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, ता. जि. धुळे येथील बी. एस. डब्ल्यू तृतीय वर्षातील विद्यार्थी व एम. एस. डब्ल्यू द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार असे लक्ष्मण पाटील, आणि हेमंत निकम यांनी सांगितले होते.
यावेळी प्रा. डॉ. सुवर्णा बर्डे, हेमंत निकम, धुळे महानगरपालिका सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील, पाडवी, प्रियदर्शनी भामरे, राहुल भोये, सपना पवार, कालू गवळी, रविना चौरे, उपस्थित होते.