धुळे :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्रात विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग व्दारा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील विदयार्थ्यांना प्राप्त होणा-या अर्थसहाय्यात समता शिक्षण संस्था,पुणे संचालित डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे,धुळे येथील 5 विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल व आई-वडिल हयात नसलेल्या विद्यार्थ्यांना सदर आर्थिक मदत विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग व्दारा केली जाते.शैक्षणिक वर्षे 2023-24 यावर्षी एकुण 25 हजार रुपये आर्थिक मदत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्राप्त झाली.
यावेळी महाविदयालयांचे प्राचार्य डॉ.विष्णु गुंजाळ यांच्या हस्ते सदर लाभार्थी विद्यार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी विभाग प्रमुख प्रा.डॉ.गोपाळ निंबाळकर,वरिष्ठ प्रा.डॉ.रघुनाथ महाजन, विदयार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.राजेंद्र बैसाणे,लेखापाल भाऊसाहेब वानखेडे,कार्यालयीन अधिक्षक विशाल भदाणे, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.मेघावी मेश्राम विश्वजित वाघ, अनिल बागुल, यश शेवाळे, ललिता कवर आदी. मान्यवर उपस्थित होते.
आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थांना ही योजना प्राप्त करुन देण्यासाठी कबचौ उमवि,जळगांव विद्यार्थी विकास विभाग, संचालक डॉ.जयेंद्र लेकुरवाडे यांचे विशेष सहकार्य लाभले.विद्यापीठाकडून प्राप्त होणारी मदत शैक्षणिक विकासाच्या दृष्टीकोनातून महत्वाची असून या योजनेमुळे मला माझे शिक्षण पुर्ण करण्यासाठी मदत होणार आहे.असे मत लाभार्थी विद्यार्थी विश्वजीत वाघ याने व्यक्त केले.
महाविदयालय नेहमी विद्यापीठाची व इतर योजनांची माहिती विद्यार्थ्यांना देवुन लाभ प्राप्तीसाठी सदैव प्रयत्न करते असे मत महाविदयालयांचे प्राचार्य डॉ.विष्णु गुंजाळ यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
सदर योजनेची माहिती विद्यार्थ्यांना देवुन निवड प्रक्रिया पुर्ण करण्यात विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.राजेंद्र बैसाणे यांनी विशेष प्रयत्न केले.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील व आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यापीठाव्दारे प्राप्त होणारी आर्थिक मदत महत्वपुर्ण आहेत.
सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले होते.