धडगाव:- नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा आणि धडगाव तालुक्याला जुळणार मुख्य रस्ता हा चांदसैली घाटात दरवर्षी पावसाळा सुरु झाला कि दरळी कोसळत असते आणि रोहदारीस अडचण निर्माण होत असते. सा. बा. उपविभाग तळोदा नंदुरबार यांना वेळोवेळी पत्र व्यवहार करून सुद्धा या रस्त्याचे काम मात्र व्यवस्थित होत नव्हते.यावर्षी देखील तळोदा चांदसैली धडगाव या रस्त्याची अगदी तशीच अवस्था झालेली आहे. हे शिवाजी पराडके ( सचिव - भाजपा नंदुरबार जिल्हा)यांच्या लक्षात येताच त्यांनी दि. 19 जुन 2024 रोजी उपविभागीय अधिकारी सा. बा. उपविभाग क्र. 2 नंदुरबार यांच्याकडे तळोदा चांदसैली धडगाव रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारे अर्ज दाखल केला. आणि दि.27 जुन 2024 रोजी शिवाजी पराडके यांनी चांदसैली घाट येथे रास्ता रोको आंदोलन करणार होते मात्र आंदोलन करण्या पूर्वीच कामाला सुरवात करण्यात आली. शिवाजी पराडके यांनी रस्ता दुरुस्ती साठी केलेल्या अर्जाची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी सा. बा. उपविभाग क्र. 2 नंदुरबार येथून शिवाजी पराडके यांना लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आले व दि. 27 जुन 2024 रोजी तळोदा चांदसैली धडगाव रस्त्याची त दुरुस्ती करण्यास कंत्राटदारांकडून सुरवात करण्यात आली आहे. धडगाव ते तळोदा रस्त्याची खड्डेमय झालेली रस्ता डांबरी पृष्ठ भाग खड्डे भरून सुस्थितीत करण्याचे काम चालु आहे .आणि संरक्षण भिंत देखील व्यवस्थित बांधकाम करून रस्ता दुरुस्तीचे काम सुरळीत चालु आहे. आता परिसरातील नागरिकांची व वाहनधारकांची गैरसोय होणार नाहीत. काम लवकरच पुर्ण करण्यात येईल. असे उपविभागीय अधिकारी सा. बा. उपविभागी क्र. 2 नंदुरबार येथून शिवाजी पराडके यांना लेखी आश्वसनामध्ये नमुद करण्यात आले आहे.या रस्ता दुरुस्तीच्या युद्धपातळीत शिवाजी पराडके यांना यश मिळाले आहे.
Post a Comment