धुळे प्रतिनिधी
धुळे :- आदिशक्ती फाउंडेशन ओझरदे व जिव्हाळा युथ ग्रुप पखरून यांच्या माध्यमातुन जिल्हा परिषद शाळा साबरखेडा येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपात करण्यात आले. आदिवासी मुलांना शिक्षणाची दिशा देणारी शाळा व हक्काची शाळा ही गावातील जिल्हा परिषद शाळा होय आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पुढे जावे म्हणून आदिशक्ती फाउंडेशन कार्य करीत असते आणि याच माध्यमातून साबरखेडा येथे फाऊंडेशन च्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी जिव्हाळा युथ ग्रुप चे अजय भोये तसेच जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक धंजी कोकणी व शिक्षक राजेंद्र गायकवाड संस्थेचे सचिव जीवन भारुडे उपस्थित होते.