ट्रायबल व्हॉईस फाऊंडेशन चा उपक्रम
धडगाव :-5 जून जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधत ट्रायबल व्हॉईस फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेने धडगाव शहरात सादर केले पथनाट्य. सदर कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रविण पावरा, उपाध्यक्ष श्री. युवराज खर्डे व सचिव श्री. सचिन पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. प्रथमतः बस स्थानक धडगाव व होळी चौक येथे पर्यावरण विषयक जनजागृती वर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले. लोकांना जंगतोडीमुळे झालेले दुष्परिणाम व दरवर्षी वाढत असलेले तापमान व त्याचे भविष्यात होणारे परिणाम या विषयी व पर्यावरण संवर्धन व संरक्षण तसेच जास्तीत जास्त झाडे लावण्याचा संदेश पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला. व जल, जंगल, जमीन यांचे आदिवासी लोकांच्या जीवनशैलीतील महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच सदर कार्यक्रमात एकूण 500 रोपे विनामूल्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन प्रकल्प व्यवस्थापक श्री. शैलेंद्र वळवी व सहकाऱ्यांनी केले. व तेगा वसावे, कृष्णा वळवी यांनी देखील कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले. तसेच ब्लॉक प्लेसमेंट साठी आलेले समाजकार्य महाविद्यालय मोराणे व अमळनेर च्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याचे सादरीकरण केले. तसेच वनक्षेत्रपाल अक्रणी कार्यालयातील पदाधिकारी व कुंभरी येथील रोपवाटिका यांच्या मार्फत एकूण 500 रोपांची उपलब्धता करून विशेष सहकार्य करण्यात आले.
Post a Comment