कार्यक्रमाच्या अनुषंगाने क्षेत्र समन्वयक शर्मिला मॅडम यांनी उपस्थित महिला व किशोवयीन मुलींना मासिकपाळी व वैयक्तिक स्वच्छता या विषयावर माहिती दिली व मार्गदर्शन केले. तसेच क्षेत्र समन्वयक किरण मॅडम यांनी कुपोषण व योग्य सकस आहार या विषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर श्री. खेमसिंग वळवी सर यांनी मासिकपाळी, कुपोषण, आरोग्य, शिक्षण व स्थलांतर या विषयी खूप चांगले मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. दिलीप वसावे यांनी देखील कार्यक्रमाचे औचित्य साधत महिलांना व किशोरवयीन मुलींना बालविवाह, कुपोषण व स्वच्छता या विषयांवर मार्गदर्शन केले. त्या नंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा व सिसा गावातील सरपंच ताई. श्रीमती. मनीषा ताई यांनी वरील सर्व विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले. व महिलांना आणि किशोरींना स्वच्छता आणि आरोग्य, शिक्षण, स्थलांतर या विषयांची माहिती देऊन आपले आरोग्य व स्वच्छता कशी राखता येईल या साठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले. त्या नंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे प्रकल्प अधिकारी श्री. शैलेंद्र वळवी यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राकेश सरांनी केले.
सिसा येथे सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न
धडगाव :- ट्रायबल व्हॉईस फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने दिनांक 08 मे 2024 रोजी सिसा येथे "सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य विषयक जनजागृती अभियान" कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील सरपंच ताई श्रीमती. मनिषा पाडवी होत्या. तसेच गावातील ज्येष्ठ शिक्षक श्री. खेमसिंग वळवी, डॉ. दिलीप वसावे, अंगणवाडी सेविका. बबिता ताई, मंगला ताई, सीमा ताई, दुर्गा ताई, रंजना ताई, सुनीता ताई, शेवंती ताई. व आशा वर्कर प्रियांका ताई, निता ताई. तसेच ट्रायबल व्हॉईस फाऊंडेशन चे प्रकल्प व्यवस्थापक श्री. शैलेंद्र वळवी व फील्ड कॉर्डिनेटॉर राकेश पावरा, शर्मिला तडवी, किरण पावरा व मनीषा पावरा. तसेच मोठ्या संख्येने गावातील महिला व किशोवयीन मुली उपस्थित होते.
Post a Comment