तलाई येथे ट्रायबल व्हॉईस फाऊंडेशन च्या वतीनेआयोजित कार्यक्रम संपन्न

धडगाव :-   सार्वजनिक स्वच्छता व आरोग्यविषयक जनजागृती अभियान अंतर्गत ट्रायबल व्हॉईस फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कुपोषण, मासिकपाळी, बालविवाह व तसेच आरोग्य, शिक्षण, स्थलांतर, रोजगार अशा अनेक विषयांवर माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तलाई उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्री. डॉ. भरत पावरा उपस्थित होते, तसेच डॉ. निरज सर व डॉ. ललित सर, ट्रायबल व्हॉईस चे व्यवस्थापक श्री.शैलेंद्र वळवी व तलई ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती. गोवाली वसावे आणि उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका, आशा समन्वयक व आशा वर्कर तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. या दरम्यान समन्वयक मनिषा मॅडम यांनी महिलांना कुपोषण,मासिकपाळी, व योग्य व सकस आहार या विषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले, तसेच डॉ. ललित सरांनी देखील कार्यक्रमाचे औचित्य साधत जास्तीत जास्त महिलांना बाळंतपणासाठी दवाखान्यातच यावे जेणे करून बाळाची व मातेची स्वच्छते संधर्भात योग्य काळजी घेतली जाईल असे आवाहन केले. त्यानंतर प्रकल्प व्यवस्थापक श्री. शैलेंद्र वळवी यांनी कुपोषण व बालविवाह तसेच सध्य परिस्थितीतील तरुण मुलांचे व्यसनाधीनता चे प्रमाण व अनावश्यक गट बाजी संबंधी माहिती दिली व असे प्रकार रोखण्यासाठी कुटुंबातील महिलांनी पुढाकार घ्यावा व चांगले पालक म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी व मुलांचे शिक्षण होई पर्यंत पाठपुरावा करावा व मुलांना योग्य दिशा द्यावी असे मार्गदर्शन केले व आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक शर्मिला मॅडम यांनी केले. व आभार प्रदर्शन मांडले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार