धडगाव :- उडद्या, धडगाव येथे वीर खाज्या नाईक यांच्या स्मृती दीन निमित्ताने आदिम पारंपरिक तिरंदाजी स्पर्धा घेण्यात आली. नर्मदा नदी किनारी वसलेले उडद्या या गावी आदिम पारंपरिक पद्धतीने तिरंदाजी स्पर्धा स्थानिक गावकरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. सातपुडा मधील आदिवासींचे ओळख असलेले प्राचीन धनुष्य बाण ची काळाच्या ओघात हरवत चालली आहे .यामुळे अशा स्पर्धा आयोजित केल्याने प्राचीन परंपरा ची जपणूक होऊ शकते. बांबू पासून बनवण्यात येणारे धनुष्य तसेच बांबू पासून बनवण्यात येणारे बाण हे सातपुडा मधील आदिवासीचे खास ओळख ,आदिवासी च्या जन्म पासून ते मृत्यू पर्यंत ही धनुष्य बान त्याची ओळख असते.
सदर स्पर्धा मध्ये अतिशय आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती . इंजि. सचिन बटेसिंग पावरा यांच्या मार्फत प्रथम बक्षीस 5000 रुपये ठेवण्यात आले. इंजि. प्रविण चिमा पावरा ( आदिवासी टायगर सेना ,महारष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष ) यांच्या मार्फत दुसरे बक्षीस 3000 रुपये ठेवण्यात आले. श्री. जिवन पावरा सामाजिक कार्यकर्ता यांच्याकडून 2000 तिसरे बक्षीस ठेवण्यात आले.श्री . तेलसिंग ठोबा पावरा, सरपंच बोरी यांच्या मार्फत 1000 रुपये चौथे बक्षीस ठेवण्यात आले . श्री. दारासिंग पावरा (APO मनरेगा) यांच्या मार्फत १००० रुपये पाचवे बक्षीस ठेवण्यात आले.
सदर स्पर्धा मध्ये एकूण १४२ तिरंदाज सामील झाले होते. तिरंदाज स्वतः या साठी बांबू पासून बनवलेले वैयक्तिक धनुष्य बाण स्पर्धेत घेऊन आले होते. प्रत्येक धनुष्य बान वर विशेष अशी आकर्षक वैशिट्यापूर्ण सुंदर नकाशी करण्यात आली होती. स्पर्धेतील नियम अनुसार सर्वात लांब बान मारणाऱ्या धनुर्धारी यांना बक्षिसे देण्यात येतील. तिरंदाज मध्ये अतिशय अतीतटी स्पर्धा आढळून आली.
स्पर्धेत प्रथम बक्षीस श्री. केलं सिंग जामसिंग पावरा यांनी पटकावले त्यांचे बान तब्बल 295 मीटर अंतर कापले म्हणजेच जवळपास 1 हजार फूट अंतर, तसेच दुसऱ्या स्थानी श्री. बायसिंग वांगाऱ्या पावरा यांना स्थान मिळाले त्याचा बान तब्बल 280 मीटर अंतर पार केले. तिसऱ्या स्थानी श्री. दशरथ मोहन्या पावरा यांना स्थान मिळाले याचा बान 275 मीटर अंतर पार केले, चोथे स्थानी श्री. तिवड्या गणपत पावरा हे राहिले यांचा बान 273 मीटर अंतर पार केले तसेच पाचव्या स्थानी श्री. सुनील वकल्या पावरा यांना मिळाले त्यांचा बान 271 मीटर अंतर पार केले. तसेच वयस्कर तिरंदाज मध्ये श्री. लखन पावरा यांच्या मार्फत 500 रुपये उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.अशा पद्धतीने थोडासा फरक प्रत्येक विजेत्या मध्ये जाणवला ,स्पर्धेतील मैदानात अतिशय सुंदर पद्धतीने सर्व धनुष्य रोवलेले पाहिले की अंगावर रोमांच येत होता . सध्याच्या काळात लोप पावत असलेले ही कला आजही येथील अबाल वृध्द बाळगून असून त्याचे ज्ञान ते येणाऱ्या पिढीस देत आहे. या स्पर्धेतून पूर्वीच्या प्राचीन काळी सातपुडा. मधील आदिवासी समाज धनुष्य बान कलेत किती निपुण आहेत हे दिसून येते यामुळं सर्वश्रेष्ठ धनुर्धर एकलव्य यांचा वारसा आताच्या काळातील युवा पेलत असून येथील युवा अजून योग्य प्रशिक्षण मिळाल्यास सातपुडा मधील युवा जगातील सर्व तिरंदाजी स्पर्धेतील पदके स्वतःच पटकावतील. देशाचा झेंडा ऑलंपिक सारख्या मानाच्या स्पर्धेत अतिशय डौलाने फडकेल. पण अजूनही लाईट सुधा नसलेला हा परिसर अजूनही देशाच्या मुख्य प्रवाहातून लांब आहेत.
तिरंदाजी स्पर्धा पार पाडण्यासाठी उडद्या येथील सरपंच श्री. शिवाजी रंगल्या पावरा ,पोलीस पाटील श्री. अंबालाल पावरा, उपसरपंच श्री. ठूमला पावरा,श्री. रंज्या पावरा,श्री. गिलदार पावरा,श्री. जाहांगा पावरा यांनी विशेष प्रयत्न केले तसेच सातपुडा पर्यटन एक शोध याची पूर्ण टीम ही स्पर्धा पार पाडण्यासाठी अहोरात्र झटत होती.
स्पर्धेला विशेष पाहुणे म्हणून सरकारी अभियोक्ता श्री. गोमता पावरा, आदिवासी टायगर सेंनेचे प्रदेश अध्यक्ष इंजी. प्रविण चीमा पावरा,धडगाव मनरेगा APO श्री. दारासिंग पावरा, अँड. छोटू वळवी,अँड. दिनेश वळवी ,युवक सामाजिक कार्यकर्ता श्री. प्रितेशकुमार पाडवी आणि सातपुडा मध्ये तिरंदाजी कला मध्ये सर्वांना मार्गदर्शन करणारे श्री. लखन पावरा यांची विशेष उपस्थिती होती.
सदर स्पर्धा ही आदिवासी ची प्राचीन तिरंदाजी कला कशी जोपासता येईल तसेच त्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू कसे घडवता येईल या इच्छेने सर्व गावकरी यांच्या वतीने घेण्यात आली. स्पर्धेला मिळालेला पाठिंबा पाहता सदर स्पर्धा आणखीन मोठ्या प्रमाणावर दर वर्षी घेण्यात येईल अशी इच्छा सर्वांनी दर्शवली.