त-हाडी:- कृषी क्षेत्राकडे सगळ्यांचे दुर्लक्ष होत असताना उच्चशिक्षित युवक मात्र शेतीत वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. असाच प्रयोग शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील कृषीभूषण व आदर्श शेतकरी नानासो श्री.सुदाम करंके व दादासो श्री कैलास करंके या दोघं भावांनी केला आहे.त्यांनी केळी पिकवून ती इराणच्या बाजारात पोहाेचवली आहे.
जैन कंपनीची केळीचे व्हरायटी त्यांनी ४५०० शे झाडे ७ जून रोजी लागवड केली होती. प्रत्येक झाडाला स्कऀटिरिंग बॅग व फुटकेअर प लावलेली होती. त्यांच्या केळीचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करून आखाती देशात चाळीस टन केळी ही २१२१ रुपये प्रति क्विंटल दराने केळी निर्यात केली गेली. त-हाडी गावासाठी व शिरपूर तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. की आपल्या शिवारातून व सिरिन बनाना महाराष्ट्र कंपनी च्या मार्फत इराण देशाच्या बाजारात केळी फळं निर्यात होत आहे. सुदाम नाना व कैलास दादा यांची केळी तसेच पपई पिकासाठी खानदेशात त्यांच्या नावाची ओळख आहे. यासाठी ते खूप मेहनत घेतात सुरुवातीपासूनच नानासाहेबांनी सांगितले होते की आपल्या शेतातून आपला माल हा दुसऱ्या देशात निर्यात झाला पाहिजे त्यासाठी त्यांनी डॉक्टर कैलास दादा करंके यांना वेळोवेळी मार्गदर्शन व नियोजन करण्यात सांगितले होते त्या पद्धतीने कैलास दादा यांनी काटेकोरपणे नानांच्या सांगितल्याप्रमाणे नियोजन केले त्यांचे फळ आज रोजी त्यांना मिळाले आहे.साता समुद्र पार करून तऱ्हाडी शिवारातील केळी पीक इराण देशाच्या बाजारात जात आहे ही आपल्या गावासाठी आपल्या खानदेशासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी त्यांना कृषी विभागातील तालुका कृषी अधिकारी साठे साहेब जिल्हा अधीक्षक तडवी साहेब ललित पाटील महेंद्र पाटील व मॅडम तसेच जैन कंपनीचे केळी तज्ञ के बी पाटील सर. गोविंद पाटील साहेब व प्रशांत वाटके साहेब यांचे सगळ्यांचे योग्य मार्गदर्शन मिळाले.
Post a Comment