सौ. सुचेता जितेंद्र सनेर यांची महाराष्ट्र नाभिक महिला कर्मचारी महामंडळ धुळे जिल्हा संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड

धुळे :- शिरपूर येथे महिला दिनाचे औचित्य साधत कै. शंकर नाना माळी मंगल कार्यालय या ठिकाणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ,  महाराष्ट्र नाभिक कर्मचारी महामंडळ व जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान शिरपूर  यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचा  कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात सौ सुचेता जितेंद्र सनेर प्राथमिक शिक्षिका यांचे सामाजिक व शैक्षणिक चळवळीतील काम पाहता तसेच विविध सामाजिक संघटनांवर केलेल्या कामाचा अनुभव पाहता त्यांना महाराष्ट्र नाभिक महिला कर्मचारी महामंडळ धुळे जिल्हा संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सौ भारती संजय सोनवणे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यांच्या या नियुक्तिबद्दल समाजातील सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.  कार्यक्रमास सौ.हेमलता रामचंद्र येशी महाराष्ट्र नाभिक महिला महामंडळ धुळे जिल्हा अध्यक्ष, सौ.पल्लवी पद्माकर शिरसाट जिल्हा उपाध्यक्ष, सौ. भारती संजय सोनवणे महाराष्ट्र नाभिक महिला महामंडळ प्रदेशाध्यक्ष, सौ. वृषाली सचिन हिरे समाजिक कार्यकर्त्या, सौ मनीषाताई जगदीश सोनगडे माजी नगरसेविका. तसेच महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा प्रतिनिधी, विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेशासाठी दिलीप येशी, रामचंद्र पवार, रवींद्र खोंडे, सी के महाले, गोपाल वरसाळे, रवी सोनगीरे, गोपाळ सैंदाणे, प्रकाश सोनवणे,विकास सेन, जितेंद्र सनेर यांनी प्रयन्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कांचन निंबाळकर तर आभार पल्लवी शिरसाठ यांनी मानले.

 

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार