धडगाव :- दि 19 मार्च 2024 रोजी ट्रायबल व्हॉईस फाउंडेशन या स्थानिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून छापरी या गावात जागतिक महिला दिवसाच्या पार्श्भूमीवर 'सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य जनजागृती कार्यक्रम' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी गावच्या सरपंच सौ रेवंती विरसिंग वळवी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून उपस्थित होत्या. आणि आंगणवाडी सेविका व आशा वर्कर उषाबाई वळवी, मंगला ताई, रेखा वळवी, मिना वळवी, पाडा सेवक ठुमाला कागडा वळवी, आणि अनिल रमेश ब्राम्हणे (जनसहस फाउंडेशन) राजेंद्र ब्राम्हणे (डीएससी). फत्तेसिंग वळवी. सेवक आणि गावातील किशोरवयीन मुली व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. व तसेच TVF टीम उपस्थित होती . कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. शैलेंद्र वळवी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. नंतर समन्वयक. मनीषा मॅडम यांचे आरोग्य या विषयावर सत्र झाले. या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी महिलांच्या स्वच्छतेचे मुद्दे मांडले आणि मासिक पाळीच्या काळात आजारांपासून स्वतःची काळजी कशी घ्यायची आणि विविध आजारांपासून बचाव कसा करायचा याचे मार्गदर्शन केले. त्यानंतर, किरण मॅडम यांनी कुपोषण या विषयावर किशोरवयीन मुलींना व महिलांना संबोधित केले. आणि महिलांना आहाराविषयी मार्गदर्शन केले. तसेच सकस पोषण आहार आपल्या दैनंदिन जेवणात कसे समाविष्ट करावे याबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर आंगणवडी सेविका मंगला ब्राम्हणे यांनी उपस्थितांना सांगितले होते की, बाळाच्या जन्मादरम्यान योग्य अंतर असावे. आणि लहान मुलांची पूर्ण वाढ होईपर्यंत एक चांगले पालक म्हणून त्यांची काळजी घेतली पाहिजे. असे मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर जनसाहस फाऊंडेशनचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी कार्यक्रमात मत मांडले. आणि TVF च्या कार्याचे कौतुक केले. आणि DSC फाउंडेशनचे प्रतिनिधी श्री राजेंद्र सर यांनीही कार्यक्रमात आपले मत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिला मॅडम यांनी केले. आणि कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात प्रकल्प व्यवस्थापक श्री.शैलेंद्र सरांनी तरुणांमधील स्थलांतर, बेरोजगारी आणि व्यसनाधीनता या विषयावर माहिती दिली व मार्गदर्शन केले. व जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने युवतींना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन अर्धवट शिक्षण पूर्ण करण्याचे आवहान केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मांडले.