तालुका प्रतिनिधी अक्कलकुवा
अक्कलकुवा :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. अजित पवार, प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्ह्यात आज पक्षबांधणीचे काम सातत्याने सुरू आहेत.
आज डॉ. अभिजीत मोरे यांच्या हस्ते विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या पार पडल्या आहेत. त्यातील निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे नावे पुढील प्रमाणे आहे.
1) जितेंद्र वळवी यांची जिल्हा संघटक सचिवपदी 2) विश्वजित वळवी यांची सोशल मीडिया
3) अक्कलकुवा तालुकाध्यक्ष जयसिंग वसावे यांची आदिवासी सेल तालुकाध्यक्ष या पदांवर नियुक्ती करण्यात आली आहेत.
अशा प्रकारे विविध पदावर अक्कलकुवा तालुक्यातील काठी गावातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे आज दि. 16 मार्च 2024 रोजी नियुक्ती करण्यात आली आहेत.
यावेळी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष छोटु कुवर, अक्कलकुवा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गजानन वसावे, जिल्हा संघटक जितू कोकनी पृथ्वीसिंग तडवी, स्वरूपसिंग पाडवी, जेकमसिंग तडवी, विक्रमसिंग वसावे आदी उपस्थिती होते. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारींचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी काठी गावातील नागरिकांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
Post a Comment