समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती कार्यक्रमा अंतर्गत मोराणे गावात रॅली, पथनाट्या द्वारे केली जनजागृती

मोराणे, धुळे :- समता शिक्षण संस्था, पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, धुळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नवीन मतदान नोंदणी,व मतदानाचे महत्व मोराणे गावातील नागरिकांना पटवून सांगितले होते. व ज्या विद्यार्थ्यांचे मतदान नोंदणी झालेली नाही अशा विद्यार्थ्यांना नवीन मतदान नोंदणी करण्याचे आवाहन देखील केले होते. आणि त्यांच्या सभोवतालच्या परिसरात, क्षेत्रकार्यांच्या ठिकाणी मतदान विषयी जनजागृती करण्यासाठी महाविद्यायचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ व प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर यांनी सांगितले. जेणे करून समाजातील सर्व उपेक्षित आणि तळागाळातील लोकांना मतदानाचे महत्व समजेल आणि ते देत असलेल्या मताचे महत्व त्यांना समजेल म्हणून सर्व युवकांना जनजागृती करण्यासाठी आवाहन केले. व त्याच प्रकारे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विष्णू गुंजाळ तसेच प्रा.डॉ. गोपाल निंबाळकर आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोराणे गावात मतदान जनजागृती विषयी रॅली व पथनाट्य सादर करून जनजागृती केली. मोराणे गावात रॅली काढण्यात आली. त्या दरम्यान मतदान जागृकते विषयी आणि नवीन मतदान नोंदणी विषयी घोषणा देखील देण्यात आल्या होत्या. 18 वर्ष पूर्ण झालेले आहे पण त्यांचे मतदान कार्ड तयार केलेले नाहीत अशा युवकांसाठी वटर हेल्पलाईन ऍप्स या मध्ये नवीन मतदान नोंदणी करू शकता या ऍप्स मध्ये कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही फ्री मध्ये नोंदणी करू शकता. मतदान कार्ड एक किंवा दीड महिन्यात पोस्ट ऑफिस मध्ये येते. मतदान करत असताना योग्य उमेदवारला मतदान करा जेणेकरून आपला गावाच्या विकास करेल आणि अडी अडचणीत समस्या सोडवेल अशाच उमेदवाराला निवडून आणा अशी मोराणे गावातील लोकांना पथनाट्य द्वारे जनजागृती व एक नवीन संदेश देण्यात आला. त्यामुळे प्रत्येक युवकांनी व वृद्ध लोकांनी आणि दिव्यांग लोकांनी सुद्धा मतदान केले पाहिजे. वृद्ध व दिव्यांग व्यक्ती साठी शासनाने वाहतूकीची सुविधा देखील काही शहरात व गावात केली आहे. आपल्या भारत देशात 100% मतदान झाले पाहिजे या उद्देशाने ही जनजागृती रॅली व पथनाट्य सादर करून मोराणे गावातील नागरिकांना एक नवीन संदेश द्यायचे होते. पथनाट्य पाहण्यासाठी मोराणे गावातील वृद्ध, युवक, महिला वर्ग देखील त्याठिकाणी उपस्थित होते. 

तसेच मतदान जनजागृती रॅली मध्ये एम. एस. डब्ल्यू. प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी व प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार