एस वी ठकार महाविद्यालय धडगांवच्या चौकशीचे जिल्हाधिकारी यांचे आदेश
धडगाव : - १० वीच्या बोर्ड परिक्षेत एस वी ठकार महाविद्यालय धडगांव या परिक्षा केंद्रात काॅपी पुरविणा-यांवर व दोषी पोलिसांवर, कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,गोपाल भंडारी,करण सुळे,धनायुष भंडारी,पवन सुळे,रमेश पटले,रवींद्र नावडे, भावसार मोते,चिका भोसले,धना ठाकरे,रायमल पवार, करण पटले,भाईदास चव्हाण, मांगीलाल पावरा,शशिकांत पावरा,दिलवरसिंग पाडवी,हारसिंग भील,फेंदा वळवी,फुलसिंग वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेचे पेपर सुरू आहेत. या परिक्षेत एस वी ठकार महाविद्यालय धडगांव या परिक्षा केंद्रात परीक्षार्थींना सर्रास काॅपी पुरवित असल्याचा विडीओ सोशल मिडीयावर वायरल होत आहे.या प्रकारामुळे नंदुरबार जिल्ह्याचे नाव बदनाम होत आहे.या प्रकाराची साम टिव्ही न्यूज चॅनेल वर सुद्धा बातमी दाखविण्यात आली आहे.कधी झाडावर, कधी भिंतीवर तर कधी खिडकीला लटकून कसलीच भिती न बाळगता काही लोक काॅप्या पुरवत असतानाचा विडीओ वायरल होत आहे. परीक्षा केंद्रात व केंद्राच्या आजूबाजूला काॅपी पुरविणा-यांचा घोळके फिरताना दिसत आहे.विद्यार्थांची गप्पा मारत आहेत. १० वीच्या पहिल्याच पेपरचे हे दृश्य आहे.ज्यांना आपण उद्याचे भविष्य म्हणतो त्या विद्यार्थ्यांना असे काॅपी पुरवून पास करून विद्यार्थ्यांचे भवितव्य खराब करण्याचा हा प्रकार सुरू आहे.पोलिसांच्या समोर ह्या काॅप्या पुरवल्या जाताय. विद्यार्थांचे मित्र व पालक ह्या काॅप्या पुरवत आहेत. परीक्षा ह्या विद्यार्थांची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी घेतली जाते परंतु अशा प्रकारे काॅपी पुरवून पास केल्यास खरी गुणवत्ता कळणार नाही.विद्यार्थांच्या भवितव्याला लागलेली ही एक कीड आहे.ही थांबवली पाहिजे.काॅपी पुरवणा-या काॅपी बहाद्दरांवर व सहभागी पोलिसांवर कडक कारवाई करण्यास यावी.हीच नम्र विनंती.जेणेकरून नंदुरबार जिल्ह्य़ात काॅपीमुक्त परीक्षा होतील. अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार यांच्याकडे करण्यात आली आहे.निवेदनाची दाखल घेऊन जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी सदर घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Post a Comment