वयोवृद्ध लोकांकडून हयात दाखला बरोबर उत्पन्नाचा दाखला जडणे रद्द करा - माहिती अधिकार कार्यकर्ता यांची मागणी

 

धडगाव :-वयोवृद्ध लोकांकडून हयात दाखला बरोबर उत्पन्नाचा दाखला जडणे रद्द करा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता धडगाव तालुका यांनी तहसिलदार अक्राणी यांच्याकडे केली आहे .दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे, की संजय गांधीच्या शाखेकडून वृद्ध लोकांकडे हयात असल्या बाबतच्या दाखल्या सोबतच उत्पन्नाचा दाखला जडणे रद्द करा. संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजना, वयोवृद्धपकाळ योजना ,इंदिरा गांधी योजना, अशा विविध योजना शासनामार्फत राबविल्या जात असून यावर्षी शासनामार्फत नवीन परिपत्रक काढले ,असून त्यात हयातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला बँक खात्याला आधार जोडणे, अशा कागदपत्रांची मागणी हात असून वयस्कर लाभार्थ्यांना अडचणी आहे. ज्या वयस्कर लाभार्थ्यांचे कोणी कागदपत्रे काढून देणारे नाही. अशा लाभार्थ्यांना अडचणीचे निर्माण झाले आहे कारण की, वयोवृद्ध लोकांसाठी जी योजना आहे. त्या योजनेत जवळजवळ 65 ते 70 वयाच्या वर्षी लाभार्थी असतील त्यामुळे त्यांना म्हातारपणात सदरच्या नवीन परिपत्रकानुसार कागदपत्रे आपल्या कार्यालयास सादर करणेसाठी अडचण निर्माण होत आहे. त्यासाठी सदर कागदपत्रांमधून उत्पन्नाचा दाखला रद्द करण्यात यावा .जेणेकरून वयोवृद्ध लोकांना अडचणी निर्माण होणार नाही अशी मागणी उदेसिंग पराडके प्रचार संघटक धडगाव तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता ,संजय पराडके मुख्य प्रचार प्रमुख धडगाव तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता, ॲड. सिना पराडके यांनी तहसिलदार अक्राणी यांच्याकडे केली आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार