उडाणे येथे, ग्रामीण अध्ययन शिबिराचे आयोजन - युवकांचा ध्यास, ग्रामीण विकास

 धुळे  :- समता शिक्षण संस्था, पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, धुळे यांच्या मार्फत एम. एस. डब्ल्यू. प्रथम वर्षाचे ग्रामीण अध्ययन शिबिराचे आयोजन उडाणे ता. जि. धुळे येथे, दि. 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2024 रोजी या कालावधीत ग्रामीण अध्ययन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

काय आहे शिबिराचे उद्देश-

शिबिराचे उद्देश व कार्यक्रम -

1) पी. आर. ए.  तंत्राने ग्रामीण जीवन व समस्या समजावून घेणे.

2) ग्रामीण समाजातील जीवनपद्धतीचा अभ्यास करणे.

3) ग्रामीण समुदायाशी संपर्क साधण्याचे कौशल्य विकसित करणे.

4) आरोग्य, शिक्षण, स्वच्छता व पर्यावरण -हास या प्रश्नावर आधारित काम व पथनाट्याद्वारे जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन.

5) सामाजिक स्तरीकरण, सामाजिक गतिशिलतेचा अभ्यास व विश्लेषण.

6) उडाणे गावाचा सर्वांगीण अभ्यास करणे व विकास प्रक्रिया जाणून घेणे.

समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रा. डॉ. विष्णू गुंजाळ, समन्वयक प्रा. डॉ. राहुल आहेर, सहसमन्वयक  प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर, सहसमन्वयक प्रा. डॉ. प्रीती वाहाने, सहकार्य, सर्व प्रा. व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी परिषद प्रतिनिधी व सर्व विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, ता. जि. धुळे   आणि सर्व ग्रामस्थ उडाणे ता. जि. धुळे

उद्दघाटन समारंभ -  दि. 5 फेब्रुवारी 2024 वेळ दुपारी 2.वाजता आहे. उद्दघाटक मा. प्रा. डॉ. शिवाजीराव पाटील ( व्यवस्थापक परिषद सदस्य, कबचौ उमवि,जळगाव ) अध्यक्ष मा. डॉ. विष्णू गुंजाळ प्राचार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे )

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांचे नावे -

1) मा. श्री. समाधान सुरवाडे पोलीस उपनिरीक्षक, आझाद नगर, पोलीस स्टेशन धुळे )

2) मा. श्री. रामदास हालोर (उपसरपंच, उडाणे)

3) मा. श्री. राजेंद्र मोरे (चेअरमन, शिक्षण समिती उडाणे )

4) मा. श्री. नवल पाटील ( अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघ, डॉ. बा. आ. स. महा. मोराणे )

5) मा. नबलाबाई आर. पवार (सरपंच, उडाणे )

6) मा. श्री. भिका  निंबा माळी ( मुख्याध्यापक जि. प. शाळा, उडाणे )

7) मा. श्री. विठ्ठल बागुल ( माजी सरपंच, उडाणे)

8) मा. श्री. सुभाष शिंदे ( सामाजिक कार्यकर्ते, उडाणे )

समारोप समारंभ -

दि. 10 फेब्रुवारी 2024  वेळ सकाळी 11.00 वा 

प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री.  महेश जमदाडे ( उपजिल्हाधिकारी, भुसंपादन जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे, ) मा. प्रा. डॉ. आरती बरिदे (सदस्य, महाविद्यालय विकास समिती डॉ. बा. आ. सं. महा. मोराणे )

अध्यक्ष मा. डॉ. विष्णू गुंजाळ प्राचार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे )

शिबीर नियोजन आणि बौद्धिक प्रबोधन

कार्यक्रमाची नावे आणि दिनांक - 

दि. 5 फेब्रुवारी 2024 वेळ   दु. 12.00 वा. उदघाटन समारंभ

दि. 6 फेब्रुवारी 2024 वेळ दु. 3 ते 5 साधन व्यक्ती - श्री. संदीप देवरे ( यंग फाउंडेशन, धुळे ) विषय - समताधिष्ठित, समाज निर्मितीमध्ये युवकांची भुमिका

दि. 7 फेब्रुवारी 2024 वेळ दु. 3 ते  5 साधन व्यक्ती - मा. श्री. प्रदीप बी. पवार ( उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धुळे ) विषय - ग्रामस्वछता आणि युवक

दि. 8 फेब्रुवारी 2024 वेळ दु. 3 ते 4  साधन व्यक्ती - प्रा. डॉ. दिनेश नांद्रे ( कृषी विज्ञान केंद्र,धुळे ) विषय - आधुनिक शेती काळाची गरज

दि. 9 फेब्रुवारी 2024 वेळ सकाळी 9 ते 12 दु. 3 ते 5   साधन व्यक्ती - श्री. शहाजी शिंदे ( नवनिर्मिती संस्था, धुळे ) विषय - पाणी व्यवस्थापन जल ही जीवन

दि. 10 फेब्रुवारी 2024 वेळ सकाळी  11. वा समारोप होईल.

अशा प्रकारे पाच दिवसांसाठी ग्रामीण अध्ययन शिबीर आयोजित केले आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार