धडगाव :- नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा,गौ-या येथे बाल आनंद मेळावा घेण्यात आला.. सर्व प्रथम गावाचे उपसरपंच यांच्या हस्ते फित कापून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली व देवमोगरा मातेला पुष्पहार अर्पण करून जूने धडगाव केंद्राअंतर्गत झालेल्या क्रीडा स्पर्धेत विविध खेळात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे ढाल व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला व इयत्ता १लीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना देखील शालेय बँग वाटप करण्यात आली तसेच शालेय विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळाव्यात विविध पदार्थाचे स्टाँल लावले. या बाल आनंद मेळाव्याला उपस्थित शाळेचे शिक्षक प्रा.विजय पराडके,प्रा.गवळे सर ,वांघबर कदम सर,चौरे मँडम, सुरेखा पावरा मँडम तसेच गावाचे उपसरपंच - मिनेश पराडके, कुवरसिंग पराडके,देवा पराडके आत्र्या पराडके ,आपसिंग पराडके गुलाबसिंग पराडके , लाला पराडके, शिला पराडके, सेनुबाई पराडके,व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोविंद पराडके कामोद खुर्द येथील विद्यार्थी व शिक्षक देखील उपस्थित होते.तसेच गौ-या गावातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment