धडगाव :- माजी मंत्री के. सी. पाडवी यांचे कट्टर समर्थक रतन पाडवी यांनी दि.02 फेब्रुवारी 2024 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला. विद्यमान जि.प.सदस्य रतन पाडवी यांच्या सोबतच काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता धडगाव तालुक्यातील राजकारणात काँग्रेस ला फटका बसला आहे. रतन पाडवी हे 1987 पासून माजी मंत्री के. सी. पाडवी यांच्या सोबत कार्यरत होते. परंतु काही कारणास्तव त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.रतन पाडवी यांचा पक्ष प्रवेश नंदुरबार येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता त्यावेळी करण्यात आला. यावेळी युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, युवक जिल्हा उपाध्यक्ष संजय पराडके,, मोहन शेवाळे, मोहन माळी, गुलाब नाईक, धुळे राष्ट्रवादीचे किरण शिंदे, ज्ञानेश्वर भामरे, सुरेश सोनवणे, नंदुरबार येथील कमलेश चौधरी, सिमा सोनगिरे, धडगाव तालुका अध्यक्ष सिना पराडके, धडगाव तालुका उपाध्यक्ष महेंद्र पाडवी, आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment