छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदन करून प्रतिमेचे पूजन करून शिबिरास सर्वात करण्यात आली सदर शिबिरांमध्ये उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तसेच महाविद्यालयातील डॉ. रघुनाथ महाजन सर , प्रा. श्यामसिंग वळवी सर उपस्थित होते त्याच बरोबर हिंद लॅब धुळे यांच्या मार्फत शिबिरांमध्ये तपासणी करण्यात आली, हिंद लॅब धुळे येथील धुळे जिल्हा समन्वयक मा. राहुल आहेर यांनी सहकार्य केले तसेच तपासणी साठी कर्मचारी नेहा जाधव, तबसून सय्यद हे उपस्थित होते. जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती रजनी चौधरी मॅडम, मा. धनंजय वाघ सर, रुपाली निळ मॅडम, शोभा पाटील मॅडम, मनीषा कढरे मॅडम आदी उपस्थित होते, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजकार्य महाविद्यालयातील क्षेत्रकार्य प्रशिक्षणार्थी माधुरी बागुल, संगीता गायकवाड, पूजा राजपूत, योगांजली बछाव, माधुरी साळुंखे, गीता आढाव, पूजा गायकवाड, प्रशांत लासुरकर, गिरीश पाटील, घनश्याम गावित, उनेश्वर गावित, गौरव चव्हाण, योगेश कोळपे, सचिन पाटील आदींनी परिश्रम घेतले.
जिल्हा परिषद मराठी शाळा येथे सिकल सेल तपासणी शिबिर संपन्न
धुळे :- समता शिक्षण संस्था पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे उपनगर धुळे. येथे समाजकार्य शिक्षण घेत असलेल्या क्षेत्रकार्य विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद मराठी शाळा या ठिकाणी सिकल सेल व हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तपासणी शिबिराचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये वाढते सिकल सेल चे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांची तपासणी करून त्यावर निदान करण्यासाठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरमार्फत विद्यार्थांना पुढील उपचारासाठी मदत करण्यात येणार आहे तसेच समाजकार्य महाविद्यालय मोराने यांच्या कडून मदत उपलब्ध करून मिळणार आहे असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ सर यांनी केले आहे.