धुळे :-आज दिनांक 19 फेब्रुवारी 2024 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंयी निमित्त प्रतिष्ठा फाउंडेशन द्वारा लळींग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.मोहीम राबवण्या मागील उद्देश म्हणजेच पर्यटन स्थळी आपण काहीतरी नवीन शिकण्यासाठी, तसेच इतिहास समजावा म्हणून जात असतो . परंतु आपण त्या ठिकाणी प्लास्टिक , कचरा व पाणी बॉटल टाकत असतो, आणि काही कुप्रकारच्या गोष्टी देखिल अनेक पर्यटक करत असतात . ज्यामुळे त्या स्थळाच्या पावित्र्याला कुठेतरी गाल बोट लागतो . आणि सोबतच निसर्गाची हानी होऊन प्रदूषण देखील होत असते . व गड किल्ले अस्वछ होतांना आपणांस दिसत असतात. दिवसेंदिवस त्यांची हानी होतच चाललेली दिसते परंतु या प्रश्नाला कुठे तरी थांबा यावा यासाठी प्रतिष्ठा फाउंडेशन चा हा एक छोटासा प्रयत्न. समाजकार्य शिक्षण घेत असलेले युवक समाजापोटी आपले काही देणे लागते या भावनेने प्रतिष्ठा ग्रुप च्या माध्यमातून धुळे शहरात व गावांमध्ये विविध विषयांवर जनजागृती करण्याच्या प्रयत्न करीत आहेत.गड, किल्ले संवर्धन तसेच स्मारके पर्यटन स्थळे यांची स्वच्छता या संधर्भात प्रतिष्ठा फाउंडेशन धुळे जिल्ह्यात कार्य करीत आहे.सदर मोहिमेच्या यशस्वीतेसाठी लळींग गावातील सरपंच श्री. दीपक परदेशी व नागरिक श्री. अशोक गवळी तसेच प्रतिष्ठा फाउंडेशन चे प्रथमेश खिल्लारे, कल्पेश निहाळे, उदय महाले, मछिंद्र पदमोर , दिलीप हालोर,सचिन पाटील, ईश्वर वाघ, आकाश गवळे, तुषार भारती आदींनी परिश्रम घेतले.