जि.प.शाळा गौऱ्या येथील विद्यार्थ्यांनी केंद्रस्तरीय क्रिडास्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधले


धडगाव :- जि.प.शाळा गौऱ्या ता. धडगाव जि. नंदुरबार येथील शाळेचे विद्यार्थी जुने धडगांव येथे केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धेत चमकदार कामगिरीने स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधले. दि.8 व 9 फेब्रुवारी 2024 रोजी जुने धडगांव केंद्राची केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धा पार पडली .या स्पर्धेत जि.प.शाळा गौऱ्याच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधले.विद्यार्थ्यांनी स्पर्धेत खालीलप्रमाणे यश मिळवले. 

  1)100 मी.धावणे लहान गट मुले विजेता-विनोद वन्या पराडके

2)100 मी.धावणे लहान गट मुली  विजेता-कु.लाली देवेंद्र पराडके

3)100×4 रिले लहान गट मुले द्वितीय क्रमांक गौऱ्या 

4)लहान गट खो-खो मुली -विजेता 

5)लहान गट कबड्डी मुली - विजेता 

6)लहान गट रस्सीखेच मुली- विजेता   

7)ल.गट खो-खो मुले - उपविजेता         

8)ल.गट कबड्डी मुले - उपविजेता     

9)ल.गट रस्सीखेच मुले - उपविजेता   

10)मोठा गट 100 मी.धावणे मुले- 

तृतीय क्रमांक यश पारता पराडके

11)मोठा गट 100 मी.धावणे मुली 

तृतीय क्र. रविना सुभाष पराडके

12) 100×4 रिले मोठा गट मुले -तृतीय क्रमांक गौऱ्या

13)100×4 रिले मोठा गट मुली

द्वितीय क्रमांक गौऱ्या

14)कबड्डी मोठा गट मुले - उपविजेता

15)कबड्डी मोठा गट मुली 

तृतीय क्रमांक

16)खो-खो मोठा गट मुले

तृतीय क्रमांक

17)खो-खो मोठा गट मुली

 तृतीय क्रमांक

18)रस्सीखेच मोठा गट मुले 

 तृतीय क्रमांक

19) रस्सीखेच मोठा गट मुली

 द्वितीय क्रमांक

       वरील प्रमाणे गौऱ्या शाळेने केंद्रस्तरीय क्रिडास्पर्धेत चमकदार कामगिरी करुन सर्वांचे लक्ष वेधले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षक श्री. विजय पराडके सर,मुख्याध्यापक श्री. गवळी सर,सुरेखा पावरा मॅडम, चौरे मॅडम सर्वांचे कौतुक होत आहे..तसेच नेहमीच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे गावातील युवक कुवरसिंग पराडके, सुंड्या पराडके,आपसिंग पराडके,उपसरपंच मिनेष पराडके, चंद्रकांत पराडके,देवा पराडके,गुलाब पराडके,रविंद्र पराडके, मनशा पराडके,दिला पराडके व इतर सहकार्य करणारे गावकरी सर्वांचे पण अभिनंदन.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार