नंदुरबार :- नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी मजुरांनी फसव्या कंपनी व ठेकेदारांकडून सावध रहा. कारण की, नंदुरबार जिल्ह्यातील बरेच आदिवासी लोक हे गुजरात व इतर राज्यात मजुरी, किंवा आपल्या दैनंदिन गरजा भागण्यासाठी मजुरी करायला जात असतात. अशा मजुरांनी वेळीच सावध होणे आवश्यक आहे. बरेच आदिवासी बांधव हे अशिक्षित असल्यामुळे कंपनीत किंवा ऊस तोळीला गेलेल्या टोळीमधील काही आदिवासी बांधवांवर अन्याय अत्याचार होतं असतात. अन्याय व अत्याचार या गोष्टी टाळण्यासाठी आपण ज्या कंपनीत कामाला जात आहे त्या कंपनीतील ठेकेदार असेल किंवा कोणीही संबंधित अधिकारी असं यांच्या करून करार करून घेणे. व त्यांनतरच कामाला लागणे, कारण की आता सध्या च्या परिस्थितीत जर बघायला गेलं तर खुप काही अन्याय,अत्याचार आदिवासी बांधवांवर होतं आहे. त्यासाठी आदिवासी बांधव हे मजुरी करण्यासाठी एखांद्या कंपनीत किंवा ऊस तोळीला जात असतांना थोडं काळजीपूर्वक आणि व्यवस्थित ठेकेदारांसोबतच कामाला जाणे आवश्यक आहे.तरी वेळीच आदिवासी बांधवांनी जागृत होणे आवश्यक आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता धडगाव तालुका संघटक - उदेसिंग पराडके