अक्क्कलकुवा :- एकलव्य शाळेचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवले आहे. एकूण ५८विद्यार्थीचा सहभाग, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल रेसि. शाळांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत तळोदा प्रकल्पातील अक्कलकुवा (तालंबा ) येथील एकलव्य मॉडेल रेसि. या शाळेने स्पर्धेत योगामध्ये २ सुवर्णं,३ रौप्य, २ कांस्यपदक मिळवून सांघिक खेळमध्ये कबड्डी १९ वर्षाखालील ( मुली ) गटामध्ये राज्यस्तरीय उपविजेता पदाचा चषक पटकावला आहे.
स्पर्धेत एकूण ५८ विद्यार्थीनी सहभाग घेतला व त्यातून ९ विद्यार्थीची कर्नाटकतील म्हैशूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली.या स्पर्धेत राज्यभरातून एकूण एक हजार ९०० विद्यार्थीनी सहभाग नोंदवला
यशस्वी विद्यार्थीना शाळेचे प्राचार्य हेमंत पी. गांगोडे, क्रीडा शिक्षक अजय गांगुर्डे, सुरेश नाईक, राजकुमार पाडवी, मनोज मुंदाणे, सरवरसिंग पाडवी, हर्षल वळवी, संजय पाडवी, योगेश वळवी, ईश्वर पाडवी, ममेश वसावे, रमेश वसावे, गौरव शेले, शोभा पावरा, शर्मिला पावरा, मंजुळा वसावे, यशोदा वसावे यांचे मार्गदर्शन लाभले.
Post a Comment