धुळे, मोराणे :- समता शिक्षण संस्था पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, धुळे येथील BSW प्रथम वर्षातील विद्यार्थी तुषार झालसे, सचिन हलोर, कार्तिक जाधव, स्मिता पाडवी, आणि दीक्षा भोये यांची 26 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या जिल्हा स्तरीय पोलीस संचालन साठी निवड झाली आहे,
नुकतंच विद्या वर्धिनी कॉलेज धुळे येथे निवड चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये वरील सहा विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांचे सद्या प्रशिक्षण सुरू आहे.
या यशाबद्दल त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा देखील दिल्या.