मोलगीच्या अल्फाबेट स्कूलमध्ये जयपालसिंह मुंडा यांची जयंती साजरा

मोलगी :- अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील मूळबीज शैक्षणिक संस्था संचलित अल्फाबेट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जयपालसिंह मुंडा यांची जयंती साजरा करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे माजी सरपंच करमसिंग वसावे तर अध्यक्षस्थानी दिलीप वसावे होते.

             कार्यक्रमाच्या सुरुवातीला जयपालसिंह मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेचे मुख्याध्यापक गोटूसिंग वळवी यांनी केली. प्रस्तावनेत त्यांनी जयपालसिंह मुंडा यांच्या जीवनकार्याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी सरपंच करमसिंग वसावे, दिलीप वसावे आणि रामसिंग वसावे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या मनोगतातून जयपालसिंह मुंडा यांच्या संविधान सभा व संसदेत आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व तसेच आदिवासी हक्कासाठी अथक प्रयत्न आणि भारतीय हॉकी संघातील विशेष कामगिरी या सर्व विषयांचा उहापोह करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे उपमुख्याध्यापक ईश्वर वसावे, लीला पाडवी, मनीषा वसावे व हिरा वळवी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ईश्वर वसावे यांनी तर आभार मनीषा वसावे यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार