धुळे, मोराणे :- आज रविवार दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 ते 12 :30 या वेळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालय मोराने ,धुळे येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत एक दिवसीय श्रमदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, या श्रमदान शिबिराच्या माध्यमातून महाविद्यालयाचे मैदान, इमारती च्या आजूबाजूचा परिसर आणि आश्रमशाळेच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली, काटेरी झाडे झुडपे काढून टाकण्यात आले, क्रीडा मैदानावरील गवत आणि दगड गोटे काढण्यात आले, आश्रम शाळेच्या परिसरातील गाजर गवत/कांग्रेस गवत काढणे आणि झाडांना आळे करून पाणी घालण्यात आले, विहिरीच्या आजूबाजूला चारी खोदून साफसफाई करण्यात आली होती.
यावेळी साधारण 45 स्वयंसेवकांनी श्रमदानात सहभाग नोंदवला. श्रमदान नंतर सर्व स्वयंसेवकांना अल्पोपहार देण्यात आला व कार्यक्रम संपला. शिबिराचे आयोजन प्रा.डॉ.गोपाळ निंबाळकर कार्यक्रम अधिकारी NSS विभाग यांनी केले, तर प्रा डॉ राजेंद्र बैसाणे यांनी ही सहभाग घेऊन शिबिर पार पडण्यास सहकार्य केले.