सदर विद्यार्थी हा होतकरु व शांत स्वभावाचा व संयमी होता त्यामुळे अशी टोकाची भूमीका घेऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया त्यांचे कुटूंबियांनी व त्याचे मित्रांनी व्यक्त केली असून घटनेचा आधी दि. 20/01/2024 रोजी रात्री 8:00 ते 8:30 वाजेच्या दरम्यान सदरील विद्यार्थ्यांनी त्यांचे वडील व परीवारातील इतर सदस्यासोबत भ्रमणध्वनीव्दारे नेहमीप्रमाणे वार्तालाप केली होती. त्यावेळी देखील त्यांचे परीवारातील कोणत्याही सदस्याला त्याची मानसिकता किंवा त्याचे वागणुकीबाबत कुठलाही बदल दिसून आला नाही. सदर घटनास्थळाचे निरीक्षण केले असता सदर विद्यार्थ्यांचे पाय दुमडून खालि जमीनीला टेकत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच सदर ठिकाणी फासी घेता समयीचा पायांचा कुठल्याही खुणा जमीनीवर दिसून येत नाहीत. त्यामुळे सदर घटना संशयाच्या भोव-यात असून सदर घटना हि घातपात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
सदर मयत विद्यार्थी हा अनुदानीत आश्रमशाळा देवमोगरा पुनर्वसन येथे निवासी शिक्षण घेत होता. सदर शालेय प्रशानाची विद्यार्थीचे काळजी, त्यांचे संगोपन व संरक्षण करण्याची पूर्णतः जबाबदारी असतांना शाळेतील कर्मचा-यांनी बेजबाबदारपणे वागुन विद्याच्यांना वाऱ्यावर सोडून अतिशय अक्षम्य अशी कर्तव्यात कसूर केलेली आहे, किंबहुना सदर घटनेमागे शाळेतील कर्मचा-यांच्या देखील सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. सदरील शाळेवर सदर घटनेची जबाबदारी टाकून त्यांना दोषी धरण्यात येऊन शाळेतील कर्मचारी तथा शाळा प्रशासनावर प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कार्यवाही प्रस्तावित करावी.अशी मागणी केली आहे.व आदिवासी आश्रम शाळेत आत्महत्या सारखे प्रकार वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.त्यामुळे आदिवासी सामाजिक संघटना आक्रमक पवित्रा घेतला आहे.सदर प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन विविध मागण्या देखील करण्यात आल्या.
सदर घटनेची सखोल चौकशी होऊन गुन्हा दाखल करण्यात यावा. सदर घटना घातापाताची असल्यास आरोपी निष्पन्न करुन गुन्हा दाखल करण्यात यावा किंवा सदर घटना आत्महत्या असल्यास आत्महत्या करणेस प्रवृत्त करणाऱ्या इसमाचा शोध घेऊन तसा गुन्हा दाखल करण्यात यावा.सदर गुन्ह्याची चौकशी विनाविलंब तात्काळ करण्यात यावी, जेणेकरुन सदर घटनेमागील पुरावा नष्ट होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.सदर शाळेतील जबाबदार कर्मचारी व शाळा प्रशासन यांचे विरुध्द कर्तव्यात कसूर केली, निष्काळजीपणा केला याबाबत जबाबदारी निश्चित करुन कठोर कारवाई करण्यात यावी. सदर विद्यार्थ्यांचे मयत पालकास रु.50,00,000/- ची नुकसान भरपाई शालेय समिती तथा शासनाने व आदिवासी विकास विभागा अंतर्गत विद्याथ्यांचा पालकांना विना विलंब तात्काळ अदा करावी.
राज्य भरातील आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या आत्महत्यांचा घटना थांबवीण्यासाठी घटनात्मक तरतुदी करुन शासन स्तरावरुन योग्य त्या उपाययोजना कराव्यात.वरील मागण्यांची पुर्तता न झाल्यास आदिवासींच्या विविध संघटनेमार्फत जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील सामाजिक संघटनांनी दिला आहे.याबाबत चे निवेदनाची प्रत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सो. महाराष्ट राज्य, मुंबई,मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस सो. गृहमंत्री, महारास्ट राज्य, मुंबई,मा.ना.श्री.दिपक केसरकर सो. शिक्षणमंत्री महाराष्ट राज्य, मुंबई,मा. पोलीस महासंचालक सो. विभाग नाशिक, नाशिक आदिवासी विकास मंत्री सो. महाराष्ट राज्य, मुंबई,मा. आमदार श्री. आमश्यादादा पाडवी , विधान परीषद सदस्य, महाराष्ट राज्य, मुंबई, मा. पोलीस अधिक्षक सो. नंदुरबार, अक्कलकुवा,प्रकल्पाधिकारी सो. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा पाठविण्यात आल्या. निवेदन देताना अॅड. रुपसिंग वसावे,अॅड संग्राम पाडवी,अॅड.गजमल वसावे,माजी.जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे,गजानन वसावे,अॅड.जितेंद्र वसावे,जयवंत पाडवी,दिलीप वसावे, माकत्या वसावे,नरपत वसावे यासह, ग्रामस्थ तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment