प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना नंदुरबार यांच्या तर्फे सीईओ यांना प्रलंबित प्रश्न संदर्भात निवेदन

  नंदुरबार:-महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, शाखा नंदुरबार शिष्टमंडळाची पहिलीच भेट घेऊन नंदुरबार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण देवरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी , उपशिक्षणाधिकारी वंदना वळवी, उपशिक्षणाधिकारी लोहकरे, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण यांच्या भेटी घेत निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. राज्याध्यक्षांचे आणि जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी नेमणूक पत्र प्रशासनाला सादर करण्यात आले. अध्यक्ष अशोक देसले, सरचिटणीस संजय वळवी, कार्याध्यक्ष गोपाल गावित, कोषाध्यक्ष सतीश पाटील, यांच्या सोबत कार्यकारिणीत सर्व प्रमुख पदांवर २३ समाविष्ट संघटनांचे सन्माननीय अध्यक्ष व सरचिटणीस उपस्थित होते. याप्रमाणे मध्यवर्ती नंदुरबार मध्ये समाविष्ट सर्व २३ संघटनांतील पदाधिकाऱ्यांचा परिचय करून देण्यात आला. मध्यवर्ती संघटनेला यापुढे वेळोवेळी सहकार्य करायचे आश्वासन दिले. नवभारत साक्षरता कार्यक्रमावर बहिष्कार राज्य मध्यवर्ती संघटनेच्या भूमिकेवर ठाम राहत नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती संघटनेकडून नवभारत साक्षरता कार्यक्रमावर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा बहिष्कार आहे व राहील. तरी या कामाबाबत शिक्षकांवर सक्ती करू नये किंवा गुन्हे दाखल कार्यवाहीची भाषा वापरू नये असे नमूद करण्यात आले. बहिष्कार विषयीचे निवेदन सादर करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे खालील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले. डिसेंबर महिन्याचा प्रलंबित पगार त्वरित होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा. पुणे कार्यालय याबाबत संपर्कात असून सीएमपी पोर्टलची तांत्रिक अडचण होती. त्यासंदर्भात शिक्षणाधिकारी महोदयांनी आजच ई -मेल केला असून लवकरच समस्या दूर होऊन आपले पगार जमा होतील असे सांगितले. या महिन्याअखेरपर्यंत मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया राबवावी. जानेवारी महिना अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. लवकरच समुपदेशन शिबिर घेण्यात येईल असेही सांगितले. पात्र शिक्षकांसाठी निवड वेतन श्रेणी टप्पा ३ पूर्ण करावा. ३१/१२/२०२३ संदर्भ दिनांक गृहीत धरून कार्यवाही केली जाईल. वरिष्ठ वेतन श्रेणी पात्र शिक्षकांना मंजूर व्हावी. दि. ३१/१२/२०२३ संदर्भ दिनांक गृहीत धरून कार्यवाही केली जाईल. भविष्य निर्वाह निधी मागील पाच वर्षांच्या हिशोब पावत्या मिळाव्यात. तसेच अनेक महिने अग्रीम प्रकरणे पेंडिंग राहतात याला कालमर्यादा ठरवावी. कंपनीशी करार झालेला असून सॉफ्टवेअर निश्चित झालेले आहे. त्यांना डाटा देण्यात आला असून जोराने काम सुरू आहे. प्रयत्न असेल की मार्च अखेरपर्यंतच्या हिशोब पावत्या नक्कीच पूर्ण करून वाटप होतील. त्यानंतर अग्रीम प्रस्ताव पण ऑनलाईनच होतील व रखडणार नाहीत. रिक्त जागांवर सेवाजेष्ठतेने पदवीधर विशेष शिक्षक नेमणूका व्हाव्यात. मुख्याध्यापक पदोन्नती नंतर या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पूर्ण केला जाईल. विज्ञान पदवीधर विषय शिक्षकांना नियमित्त वेतन श्रेणी मंजूर करावी. या महिन्यातच सदर मागणी पूर्ण होईल. वैद्यकीय बिले अनेक महिने रखडतात त्याला कारण मर्यादा ठरवून वेळीच सर्व बिले मंजूर व्हावीत. याविषयी कालमर्यादा ठरवून काम केले जाईल. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना शासन निर्णयानुसार एक जादा वेतन वाढ देण्याची कारवाई लवकरच पूर्ण करावी. चर्चा, इतर जिल्ह्यात याविषयी ज्यादा वेतनवाढ देण्याची कार्यवाही झालेली असल्यामुळे आपल्या जिल्ह्यातील त्या बाबतीत कार्यवाही करण्याची प्रक्रिया होईल.१ जानेवारी २०२४ संदर्भ दिनांक गृहीत धरून शिक्षण मधील सर्व केडरच्या सेवाजेष्ठता याद्या प्रसिद्ध कराव्यात. चर्चा, तीन केडरच्या याद्या तयार असून पुढील महिन्याच्या आतसुरुवातीला सर्व सेवाजेष्ठता याद्या प्रसारित होतील. निवडश्रेणी मंजूर झालेल्या शिक्षकांच्या फरकाची रक्कम अदा होणे बाबत. चर्चा, सर्व तालुक्यांच्या निवडश्रेणी धारक शिक्षकांच्या फरक रकमेच्या मागण्या व त्यांची रक्कम एकत्रित करून सदर रकमेची मागणी वरिष्ठांकडे नोंदवून मार्चपूर्वी फरक जमा करण्याची प्रक्रिया राबवण्यात येईल. नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षक बंधु-भगिनींच्या प्रश्नासाठी नंदुरबार मध्यवर्ती संघटनेतील समाविष्ट सर्व २३ संघटनांच्या पदाधिकारी बांधवांच्या वतीने प्रलंबित अडचणी प्रशासनासमोर सविस्तर मांडण्यात आल्या. आणि प्रशासनाकडून चर्चा करून सविस्तर उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला. सकारात्मक प्रतिसाद मिळाला. भविष्यातही नंदुरबार मध्यवर्ती संघटना एक मताने व एक दिलाने आपल्यासाठी सदैव कार्यरत राहणार आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती, नंदुरबार मधील समाविष्ट संघटनाचे पदाधिकारी अशोक देसले, संजय वळवी, गोपाल गावीत, सतीश पाटील, परमेश्वर मोरे, भगवान सोनवणे, करणसिंग वसावे, संजय खैरनार, ज्ञानेश्वर इंदासराव, अशोक बच्छाव, नेहरू नाईक, इंदास गावीत , उमेश बेडसे, अनिल गांगुर्डे, भरत सावंत, प्रवीण देवरे, संजय घडमोडे, भटू बंजारा, बलवंद देवरे, किशोर चौधरी, गोकुळदास बेडसे, पंकज भदाणे, अनिल बेडसे, सुभाष सावंत, अनिल सोनवणे, राकेश गावीत, संजय गावीत, विष्णू गावीत,अमृत पाटील, रामराज गायकवाड, आनंदराव करणकाळ, राहुल पवार, मनोज सोनवणे, दिपक भदाणे, रघुनाथ बैसाणे, रवींद्र आडगाळे, रमेश गावित, भगतसिंग पावरा, महेंद्र बैसाणे, विश्वास देसाई, निदेश वळवी आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार