बार्टीकडून सरी शासकीय आ शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभिवादन

 

 अक्कलकुवा :- अक्कलकुवा तालुक्यातील शासकीय माध्यमिक आ शाळा सरी येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त मोलगी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरिक्षक राजेश गावीत,शाळेचे मुख्याध्यापक देवजी वसावे बार्टीचे समतादूत ब्रिजलाल पाडवी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक राजेश गावीत यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत ध्येय गाठण्यासाठी पाया मजबूत करण्याचे आव्हान केले.तसेच आजचा युवा हा बिडी,सिगारेट,दारु या व्यसनाच्या आहारी वळला आहे त्यासाठी व्यसनापासुन दुर राहण्याचा सल्ला दिला,तसेच कमी वयात बालविवाह केल्याने जन्माला येणाऱ्या बालकावर दुष्परिणाम निर्माण होतात अशा विविध विषयावर मार्गदर्शन केले.

         डाॕ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेचे तालुका समन्वक ब्रिजलाल पाडवी यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा आदर्श घेण्याची गरज असल्याचे मत मांडले.सहाय्यक पोलीस निरिक्षक राजेश गावीत यांच्या हस्ते प्रकल्प स्तरीय खो-खो,कबड्डी,धावणे अशा विविध खेळामध्ये प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक देवजी वसावे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.कार्यक्रमासाठी मोजु वळवी,मोगरा वसावे,अनिता वसावे,सुनिता वळवी,निर्मला पवार,शिक्षक शिक्षकेत्तर व विद्यार्थीसह मोठ्या संख्येत उपस्थित होते.

            सूत्रसंचालन गुलाबसिंग राऊत तर आभार विलास पाडवी यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार