चाळीसगाव :- दिनांक 07 जानेवारी 2024 ते 09 जानेवारी 2024 या कालावधीत गरुड झेप अकॅडमी नाशिक येथे पार पडलेल्या आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत आमच्या अनुदानित प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा खडकी बु! ता.चाळीसगाव जिल्हा जळगाव शाळेने उज्ज्वल यश संपादन केले.
राज्यस्तरावर पदक प्राप्त खेळाडू:-
1) 17 वर्षे वयोगट
प्रविण पाश्या वसावे - गोळाफेक - तृतीय क्रमांक
2)19 वर्षे वयोगट मुले
1) निलेश रमेश वसावे - ३००० मी धावणे यांनी राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धेत चौथा क्रमांक मिळविला.
यशस्वी खेळाडूंचे आमच्या संस्थेचे संस्थापक मा.प्रा.माजी आमदार साहेबराव घोड, संस्थेचे अध्यक्ष मा.संजय घोडेस्वार , यांनी अभिनंदन व कौतुक केले.शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापिका रंजना घोडेस्वार मॅडम , माध्यमिक मुख्याध्यापक श्री अमोल घोडेस्वार व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.*यशस्वी खेळाडूंना शाळेतील क्रीडा मार्गदर्शक श्री लक्ष्मण वळवी सर, यांचे मार्गदर्शन लाभले.
Post a Comment