संदीप वसावे
अक्कलकुवा :- दरवर्षीप्रमाणे अक्कलकुवा वकील संघाची सर्वसाधारण सभा वकील संघाचे सचिव ॲड. रुपसिंग वसावे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. या सभेमध्ये मागील कार्यकारणीकडून वार्षिक अहवाल सादर करण्यात आला.यात अध्यक्ष, उपाध्यक्ष पद रिक्त झाल्याने अक्कलकुवा तालुका वकिल संघाची अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासंदर्भात चर्चा करण्यात आल्या व चर्चे अंती अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड करण्याचे ठरले. त्याप्रमाणे अध्यक्ष ,उपाध्यक्ष या पदासाठी अर्ज मागविण्यात आले असता या अध्यक्ष पदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले व प्रक्रिये अंति एका उमेदवाराने माघार घेतल्याने दोन उमेदवार निवडणूक रिंगणात होते.त्यात निवडणुकीत ॲड. संग्राम पाडवी यांना सर्वाधिक मतं मिळाल्याने त्यांना अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. व उपाध्यक्ष पदासाठी एक अर्ज दाखल झाल्याने उपाध्यक्ष म्हणून ॲड. निशा पाडवी हिची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणुक अधिकारी यांनी दोन्ही नावाची घोषणा केली. हि निवडणुक अत्यंत खेळी मेळीच्या वातावरणात व शांततेत पार पडली . या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरकारी अभियोक्ता ॲड.एम. आय. मन्सुरी,
सरकारी अभियोक्ता ॲड.आय. टी. वळवी व ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.इमरान पिंजारी यांनी काम पाहिले. यावेळी वकील संघाचे सह सचिव ॲड.दिपक वळवी, खनिजदार ॲड.गजमल वसावे, सदस्य ॲड.रविंद्र वसावे, सदस्य ॲड.फुलसिंग वळवी, आधी पदाधिकारी उपस्थित होते. सभेत मोठ्या संख्येने वकील सभासद उपस्थित होते. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना सर्व वकील सभासदानी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post a Comment