धुळे :- समता शिक्षण संस्था पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय ,मोराने ,धुळे येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आज महाविद्यालयात मानवी हक्क दिवस साजरा करण्यात आला. 10 डिसेंबर हा दिवस सर्वत्र जागतिक मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो,हा दिवस युनायटेड नेशनन्स ऑर्गनिझशन (युनो ) यांच्या ठरावानुसार सन 1948 पासून साजरा करण्यात येतो, प्रत्येक नागरिकाला जात ,लिंग ,धर्म, वंश किंवा अन्य बाबीमुळे कोणत्याही संधी, लाभ किंवा सुविधांपासून वंचित ठेवता येणार नाही असे ठरावात म्हटले आहे. प्रत्येक नागरिकाला जन्मतः सर्व हक्क आणि अधिकार प्राप्त होत असतात, हीच मानवी हक्कांची खरी संकल्पना आहे, असे सर्व मानवी हक्क सर्वसामान्य लोकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे विचार आदरणीय प्राचार्य डॉ विष्णू गुंजाळसर यांनी या प्रसंगी मांडले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांची शिस्त, सर्वांगीण वाचन, विविध कौशल्ये आत्मसात करणे, स्पर्धा परीक्षाची तयारी करणे, कसे आवश्यक आहे याबाबत ही मार्गदर्शन केले . तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा अनिल दाभाडे यांनी मार्गदर्शन करताना भारतात प्रामुख्याने संवेदनशील घटक आणि दुर्बल घटक यांच्या मानवी हक्काचे नेहमी हनन होत असते, अश्या घटकावर अन्याय अत्याचार तर होतीच शिवाय त्यांना योग्य न्याय पण मिळत नाही, शासनाच्या यंत्रणा कडून योग्य ते सहकार्य आणि सहयोग मिळत नसतो, या करिता समाज कार्याचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करावा, भारतीय संविधानातील कलम 32 आणि 226 नुसार आपण अनुक्रमे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात दाद मागू शकतो, जनहित याचिका दाखल करू शकतो, वेगवेगळ्या घटकासाठी नेमलेल्या आयोगाकडे तक्रार दाखल करून न्याय मागू शकतो असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर यांनी केले, सूत्रसंचालन विद्यार्थीनी कु. प्रज्ञा हिवाळे हिने तर आभार प्रदर्शन कु ऐश्वर्या मोरे हिने केले.कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.