मोलगीच्या अल्फाबेट स्कूल मध्ये सस्नेह पालक मेळावा

मोलगी :- अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील मुळबीज शैक्षणिक संस्था संचलित अल्फाबेट इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दिवाळी सुरु होण्यापूर्वी शाळेची प्रिंसिपल गोटूसिंग वळवी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी-शिक्षक व पालक सस्नेह सभा घेण्यात आली.

           कार्यक्रमाच्या सुरुवातीला लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेच्या शिक्षिका मनीषा वसावे यांनी केले. व शाळेचे वाईस प्रिंसिपल ईश्वर वसावे यांनी मुला-मुलींना मार्गदर्शन करत दिवाळी कशी साजरी करायची हेही सांगितले. तसेच त्यांना दिवाळीच्या सुभेच्छा दिल्या त्यानंतर गोड खाऊ दिला. शाळेचा दिवाळी अगोदर शेवटचा दिवस असल्याने सर्व विद्यार्थीच्या चेहऱ्यावर अतीप्रसन्नता दिसून आली.

       विद्यार्थ्यांच्या मौज-मोजेनंतर पालकांसाठी पालक सस्नेह सभा घेण्यात आली. या सभेत एजेंड्याप्रमाणे पालकांशी चर्चा करण्यात आली. चर्चेमध्ये विद्यार्थ्यांच्या सकारात्मक विकासासाठी वेगवेगळे विषय घेण्यात आले. त्यानंतर पालकांमधून अनुभवी आंगणवाडी सेविका व पालक इंदिराताई पाडवी व सोहम पाडवी आपल्या मनोगतात शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रगती पाहून शिक्षकांचे व संस्थेचे अभिनंदन केले. या सभेसाठी डॉ. रविंद्र वसावे, डॉ. संजय वळवी, नारसिंग वळवी, वासुदेव बोरदे, पवन पाटील, दारासिंग वळवी, शरद पाडवी, रमेश वसावे, दिनकर वसावे, महेन्द्र वाडिले, बलविन्दर तडवी, भावना ढोले, शेवन्ता वसावे, यशोदा वळवी, भाग्यश्री गुणगे, मालती नाईक, निर्मला वसावे, छाया वसावे, प्रियंका वसावे, शर्मीला वळवी, कीर्ति चव्हाण, प्रदीप पाडवी, अजय वसावे, अजय तडवी, दिपक पाडवी व महिला वर्ग तसेच इतर पालक व विधार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर सभेचे सूत्रसंचलन ईश्वर वसावे यांनी तर आभार शिक्षिका मनीषा वसावे यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार