मोलगी :-अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व ईरा किड्स इंग्लिग स्कूल मोलगी यांच्या संयुक्त विद्यमाने आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती साजरा करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ईरा किड्स इंग्लिग स्कूल मोलगी प्राचार्य राजेश तडवी अध्यक्षस्थानी हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेचे शिक्षक राकेश पाडवी यांनी केली. त्यानंतर बार्टीचे समन्वयक ब्रिजलाल पाडवी यांनी विद्यार्थ्यांना आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे जिवन कार्य व इंग्रजांनी शेतकरीवर अन्याय अत्याचार करुन हुकुमशाहीवर माहिती दिली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेश तडवी यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात शितल पाटील यांनी राघोजी भांगरे यांचे सामाजिक कार्य व योगदानाविषयी माहिती दिली. कार्यक्रमास दिलीप पाडवी,राधिका वसावे,हिरा तडवी यांची प्रमुख उपस्थिति होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राकेश पाडवी यांनी केले तर आभार शिक्षिका शितला पाटील यांनी मानले.