विधान परिषदेचे आ. आमश्या पाडवी यांच्या हस्ते मोलगीत दातांचा दवाखान्याचे उद्धाटन

 

प्रकाश नाईक तालुका प्रतिनिधी अक्कलकुवा

अक्कलकुवा :- अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे दातांचा दवाखान्याचे उद्घाटन कार्यक्रम दि. १८ नोव्हेंबर २०२३ रोजी विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. मोलगी निंबीपाडा येथील न्यायाधीश डी.टी.वसावे यांची कन्या डॉ.पुष्पा वसावे हिने हा दवाखाना सुरू केला आहे. डॉ.पुष्पा वसावे हिने यापुर्वी पुणे येथे प्रॅक्टिस केली आहे. अनेक डॉक्टर्स शहराना प्राधान्य देत असतात. मात्र डॉ. पुष्पा वसावे हिने आपल्या मायमातीला न विसरता, मोलगी सारख्या दुर्गम व ग्रामीण भागातील रुग्णांची सोय उपलब्ध व्हावी म्हणून हा दवाखाना सुरू केला आहेत.

 या दवाखान्यात उपचारासाठी अदयायावत सुविधा असल्याने यामध्ये किडलेल्या दाताचे रुट कॅनल करणे, कॅप बसवणे, इंप्लांट,दात काढणे, व नवीन दात बसवणे, सर्व जबड्याशी संबंधित आजारांवर उपचार होणार असल्याने मोलगी सारख्या दुर्गम भागातील जनतेची मोठी सोय होणार आहे असे मत विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी बोलतांना व्यक्त केले आहे.

 यावेळी विशेष सरकारी अभियोक्ता राजेंद्र वळवी, ॲड.अभिजित वसावे,ॲड.रुपसिंग वसावे, ॲड.रविंद्र वसावे, ॲड.गजमल वसावे, ॲड.सावंत वसावे, ॲड.संग्राम पाडवी, सामाजिक कार्यकर्ते धनसिंग वसावे,डाब सरपंच आकाश वसावे,कात्री सरपंच संदीप वळवी, डॉ.दिलवरसिंग वसावे,डॉ.सायसिंग वसावे, सामाजिक कार्यकर्ते हिरामण पाडवी, बिरसा ब्रिगेडचे संदीप वळवी यांसह डॉक्टर ,वकील, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार