बालविवाह वर विधायक भारती तर्फे, विविध गावात कलापथक (सोंगाड्या पार्टी) माध्यमातुन जनजागृती

धडगाव :-विधायक भारती यांच्या संयुक्त विध्यमाने धडगाव तालुक्यातील कार्यक्षेत्राच्या बिलबारापाडा ,मनखेडी बु !!,खडकला ,जुम्मट गावात  शिक्षण ,बाल हक्क बाल संरक्षण या मुध्यानआधारित शिक्षण,बालमजुरी,बालविवाह या विषयावर कलापथक (सोंगाड्या पार्टी) यांच्या माध्यमाने जनजागृती करण्यात आली.

     बालविवाह,बालमजूरी, प्रतिबंध शिक्षणाचे आणि आरोग्याचे महत्व सदर मुध्यांन वर समुदायात जाणीव जागृती करणे.या उद्देशाने कार्यक्रम राबविण्यात आला असून मुलांना न शिकविल्यास कुटुंबांवर(दारिद्र) होणारा परिणाम शिवाय शिक्षण घेतल्याचे फायदे  बालविवाह केल्याने मातेला आणि बळावर आरोग्याने परिणाम कुपोषण प्रमाण-कायदा काय म्हणतो,बालमजुरीने बालकावर होणारा परिमाण तसेच कायदा इत्यादी मुद्दे नाटिकेतून सादर करण्यात आले.जनजागृती कार्यक्रम घेण्यास अतीगरज असल्याचे शिवाय कार्यक्रमातून बालविवाह,बालमजुरी होऊ न देण्याचा. सर्व मुलांना शिक्षण देण्याच्या निर्णय स्थानिक नागरिक - आपसिंग पावरा मनखेडी बु!! , वाहाऱ्या पावरा बिलबारापाडा, पालसिंग पावरा खडकला, दमण्या वळवी जुम्मट यांनी मत व्यक्त केले.गावातील यंत्रणा सरपंच,उप सरपंच,ग्राम पंचायत सदस्य,पोलीस पाटील अंगणवाडी सेविका ,आशा सेविका,जेष्ट नागरिक,शिक्षक,किशोरी/किशोर,महिला,पुरुष मोठ्या संख्येने उपोस्थित होते.

मा.संतोष शिंदे (माजी सदस्य-महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग),कृष्णामाई सातवसे यांच्या मार्गदर्शनाखाली रुपसिंग पावरा, आपसिंग ठाकरे, राकेश पावरा, पंकज पावरा, दिलीप पावरा, संपत पावरा, कपिल पावरा, निशा वळवी यांनी सदर कार्यक्रमात परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार