अक्कलकुवा :- आमशा दादा पाडवी विधान परिषद आमदार यांना धडगांव तालुक्यातील धडगांव ते पिंप्रापाणी रस्त्याचे काम मागील २ वर्षापासून चालू आहे मात्र आजतागायत काम पूर्ण झालेले नाही. धडगाव ते पिंप्रापाणी या रस्त्याची अत्यंत दयनीय अशी अवस्था झालेली आहे.म्हणून निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात मोलगी ते धडगाव रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झाली आहे सगळी कडे रस्त्याला खड्डे झालेले आहे. रस्त्याला संपूर्ण खड्डे असल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात निष्पाप लोकांचा मृत्यू होत आहे. अजुन अशा किती निष्पाप लोकांचा बळी जाणार नागरिकांनी उपस्थित केला आहे.असा प्रश्न आमदार आमश्या पाडवी यांच्याकडे एका निवेदनद्वारे करण्यात आला आहे.तालुक्यात सर्वत्र रस्ते मृत्युंना आमंत्रण देत आहे.अशा अपघातामुळे अनेकांचे कुटूबे उघड्यावर येत आहे. संबंधित विभागाला वारंवार निवेदने देऊन देखील ठेकेदार व संबंधित यंत्रणा यांचे सदर रस्त्याच्या कामावर दुर्लक्ष केले जात आहे. सदर रस्त्याच्या कामावर शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या संबंधित ठेकेदारांवर बंदी घातली पाहिजे. अशी मागणी केली जात आहे. सदर निवेदन दिल्यांनतर मा.आमशा दादा पाडवी यांनी सबंधित ठेकेदाराला संपर्क साधून कामाबद्दल विचारणा केली असता सबंधित ठेकेदार यांनी १ महिन्याच्या आत रस्त्याचे काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले आहे. यावेळी निवेदन देतांना श्री. बळीराम पावरा, श्री.महेंद्र पराडके, श्री.अश्विन वळवी यांच्या सहया आहेत.
Post a Comment