चाळीसगाव :- खडकी बु!! येथील अनुदानित आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा खडकी बु ता.चाळीसगाव जि जळगाव येथील शाळेच्या विद्यार्थयांनी बीट स्तरीय क्रीडा स्पर्धेत विविध सांघिक क्रीडा प्रकारात सुयश मिळवले आहे. .दिनांक ०६/१०/२०२३ ते ०७/१०/२०२३ या दोन दिवशीय बीट स्तरीय क्रीडा स्पर्धा अनुदानित आश्रम शाळा बोळे- तांडा तालुका पारोळा या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेत चाळीसगाव बीटमधील सर्व आश्रम शाळांचा सहभाग होता. सांघिक खेळ प्रकारात 17 वर्षातील मुलांच्या संघाने हँडबॉल, तर 14 वर्षातील मुले खो-खो या प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला.या दोन्ही संघांची जिल्हास्तरीय म्हणजेच प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच मुलींच्या सांघिक क्रीडा स्पर्धेत 14 वर्षातील मुलींच्या संघाने खो-खो ,17 वर्षातील मुली या संघाने खो-खो या प्रकारात प्रथम क्रमांक म्हणजेच अंतिम सामने जिंकून विजय मिळवला. या 14 व 17 वर्षातील मुलींच्या संघाची प्रकारात जिल्हास्तरीय( प्रकल्पस्तरीय) स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
खडकी आश्रम शाळेतील व त्यांच्या सोबत शिक्षक क्रीडा स्पर्धेत सहभागी विध्यार्थी
क्रीडा स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक माजी आमदार प्रा.साहेबराव घोडेस्वार व संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक प्रा संजयजी घोडेस्वार,सचिव माजी समाजकल्याण सभापती ताईसो दर्शना घोडेस्वार प्राथमिक मुख्याध्यापिका रंजना घोडेस्वार मॅडम ,माध्यमिक मुख्याध्यापक श्री .अमोल घोडेस्वार सर व सर्व शिक्षक -शिक्षिका व शिक्षककेतर कर्मचारी विजयी संघातील विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. तसेच क्रीडा स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांना संघ व्यवस्थापक प्रा लक्ष्मण वळवी सर , श्री. विजय पाटील सर , श्री . प्रशांत लंवगे सर व मुलींच्या संघ व्यवस्थापिका श्रीमती. भाग्यश्री दराडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले . विजयी खेळाडूना पुढील स्पर्धेसाठी सूभेच्छा दिल्या.
Post a Comment